शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण करणार ग्राहकांशी संपर्क

By admin | Updated: July 6, 2015 01:45 IST

शेतक-यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर आली जाग, दलाली रोखण्यासाठी प्रयत्न.

अकोला : तळेगाव बाजार येथील शेतकरी विनोद खारोडे यांची आत्महत्या व सागद येथील तायडे दाम्पत्याच्या आत्महत्येचा प्रयत्नानंतर महावि तरणमध्ये मोठय़ा प्रमाणात दलाली होत असल्याचे उघडकीस आले. या शेतकर्‍यांनी विष प्राशन केल्यानंतर महावितरणला जाग आली असून, आता ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. अमरावती परिमंडळातील पाचही जिल्ह्यांमध्ये महावितरणकडून सदर संपर्क अभियान राबविण्यात येईल. या माध्यमातून प्रत्यक्ष ग्राहकांशी भेटून त्यांचे प्रश्न, तक्रारी व समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच त्याचवेळी निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याशिवाय तत्काळ कार्यवाही सोबतच महावितरणच्या योजनांची माहिती व सद्यस्थिती ग्राहकांना सांगितली जाणार आहे. अमरावती परिमंडळातील काही भागांमध्ये नुक त्याच ग्राहकसेवेसंदर्भात काही अप्रिय घटना घडल्या आहेत. यातील सहभागी काही निवडक कर्मचारी व बाहेरच्या दलालांनी केलेली ग्राहकांची दिशाभूल व वस्तुस्थिती सांगण्याकरिता महावितरणकडून ग्राहक संपर्क अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पाचही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये नियोजित तारखेनुसार शिबिर आयोजित करण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अभियानातील संपर्क शिबिरांमध्ये जिल्ह्याचे मंडळाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व जनमित्र उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये ग्राहकांच्या तक्रारी, प्रश्न व समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. यामध्ये तक्रारीच्या स्वरूपानुसार जागेवरच तत्काळ कार्यवाही व कारवाईसुद्धा होणार आहे. या शिबिरामध्ये उपलब्ध तांत्रिक स्वरूपानुसार मद तीने त्याच दिवशी तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.