शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण अकोल्यासह चार ठिकाणी फ्रँचायसी देण्याचा तयारीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:39 IST

राज्यातील महावितरण कंपनी प्रायोगिक तत्त्वावर कंत्राट पद्धतीने फ्रँचायसी देण्याच्या तयारीत आहे. अकोल्यासह धुळे, मालेगाव आणि मुंब्रा या चार ठिकाणी ही पद्धत राबविल्या जाण्याचे संकेत आहेत. 

ठळक मुद्देप्रकाशगडावर झाली अधिकार्‍यांची बैठक भारनियमनामागचा छुपा अजेंडा

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील महावितरण कंपनी प्रायोगिक तत्त्वावर कंत्राट पद्धतीने फ्रँचायसी देण्याच्या तयारीत आहे. अकोल्यासह धुळे, मालेगाव आणि मुंब्रा या चार ठिकाणी ही पद्धत राबविल्या जाण्याचे संकेत आहेत. गत काही दिवसांपासून महाराष्ट्रात अचानक भारनियमन वाढले असून, नागरिक आणि उद्योजक या अकस्मात भारनियमनाने त्रासले आहेत. कोळसा आणि पुरेसे पाणी नसल्याने हे संकट राज्यावर असल्याचे महावितरणकडून सांगितले जात आहे; मात्र राज्याच्या भारनियमनामागे कंपनीचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप महावितरणच्या वतरुळात आहे . फ्रँ चायसीसंदर्भात ऑगस्ट महिन्यात प्रकाशगडावर वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत मुंबई आणि औरंगाबादच्या धर्तीवर अकोला, धुळे, मालेगाव आणि मुंब्रा येथील केंद्रांवर प्रयोग केला जाणार असून रिलायन्स, टाटा आणि जीटीएल आदी कंपनीच्या ताब्यात या चारही ठिकाणच्या फ्रँ चायसी दिल्या जाण्याची शक्यता विश्‍वसनीय सुत्रांनी व्यक्त केली.  या संदर्भात महावितरणचे अधिकारी प्रतिक्रीया देण्यासाठी पुढे येत नाहीत.

महावितरण कंपनीने औरंगाबाद येथील फ्रँ चायसी जीटीएल कंपनीला दिली होती; मात्र येथे जीटीएल कंपनी अपयशी ठरली आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यात. महावितरण आणि जीटीएल दोन्ही कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागला. औरंगाबादमध्ये अपयश आल्यानंतरही महावितरण कंपनीने पुन्हा त्या दिशेने पाऊल उचलले जात आहे.  

कंत्राट पद्धतीने फ्रँ चायसी  दिल्यास अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर लागणारा आस्थापनेचा खर्च कमी होणार आहे. नागरी सुविधा आणि जबाबदारीदेखील कंपनीवर टाकली जाणार असल्याने महावितरण कंपनी खासगीकरणाला जास्त वाव देत असल्याची चर्चा होत आहे.-