शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीसाठी सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शिवसेनेच्या नेतृत्वात अस्तित्वात आलेल्या राष्टÑवादी व काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यातील प्रयोग जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शिवसेनेच्या नेतृत्वात अस्तित्वात आलेल्या राष्टÑवादी व काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यातील प्रयोग जिल्हा स्तरावरही करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसह भाजपला प्रबळ आव्हान उभे करण्यासाठी महाविकास आघाडी गठित करण्यासाठी रविवारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी गठित करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली असून आघाडी व्हावी, यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अकोला जिल्हा परिषदेवर गत अनेक वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. या माध्यमातून ‘वंचित’ने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मजबूत पकड निर्माण केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने चारही मतदारसंघात निर्विवाद यश मिळविले आहे. वंचित बहुजन आघाडीला यश मिळाले नसले तरी अकोला पश्चिम या शहरी मतदारसंघाचा अपवाद वगळला तर उर्वरित चारही मतदारसंघांत ‘वंचित’ने कडवी झुंज देत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या दोन पक्षांची बांधणी मजबूत असल्याचे अधोरेखित झाले आहे. या पृष्ठभूमीवर भाजप व ‘वंचित’ला आव्हान देण्यासाठी एकत्रित ताकद निर्माण केली तर ती अधिक प्रबळ ठरेल, या उद्देशाने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये महाविकास आघाडीची रणनीती ठरत आहे. याच अनुषंगाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांची रविवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये आघाडीसंदर्भात तसेच काही मतदारसंघांबाबत चर्चा झाली आहे. तिन्ही जिल्हाध्यक्षांची ही पहिलीच बैठक होती; मात्र बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, आघाडीबाबत तिन्ही पक्ष अनुकूल असल्याची माहिती आहे.

सर्वोच्च न्यायालयाकडे लक्ष!जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत आरक्षित जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घेत आरक्षण अधिनियमात बदल करून संपूर्ण अहवाल १६ डिसेंबर रोजी सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्य सरकार न्यायालयात काय भूमिका सादर करते व न्यायालय काय निर्णय देते, यावरच जिल्हा परिषद निवडणुकीचे भविष्य ठरणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत आरक्षित जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याच्या मुद्यावर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्याबाबत सोमवारी निकाल अपेक्षित आहे.महाविकास आघाडीच्या निमित्ताने रविवारी बैठक झाली. प्राथमिक चर्चा झाली आहे. पक्षश्रेष्ठींसोबत याबाबत अधिक चर्चा करून पुढील निर्णय घेऊ- आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना.

आघाडीसाठी आज झालेली चर्चा सकारात्मक होती. ही चांगली बाब आहे. उद्या जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. त्या निकालानंतर पुढील रणनीती ठरवू.- हिदायत पटेल,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

आघाडी करण्याबाबत तीनही पक्षांचे एकमत झाले. काही मतदारसंघांवरही सकारात्म्क चर्चा झाली. आता पुढील बैठक मंगळवारी नागपूर येथे होण्याची अपेक्षा आहे. सोमवारचा निकाल काय येतो, याकडेही लक्ष आहे.-संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदElectionनिवडणूक