शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राने मारली बाजी

By रवी दामोदर | Updated: December 29, 2023 18:20 IST

६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत देशभरातून १५०० च्यावर खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

अकोला : शहरात स्व. वसंत देसाई स्टेडियमध्ये सुरू असलेल्या ६७व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकून महाराष्ट्र संघाने बाजी मारली, तर सात सुवर्ण पदक प्राप्त करीत हरियाणाचा संघ द्वितीय ठरला आहे. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना दि.२९ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले.

६७ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत देशभरातून १५०० च्यावर खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत प्रत्येक सामना चुरशीचा रंगला असून, तब्बल ८ सुवर्ण पदक मिळवित महाराष्ट्राचा संघ अव्वल ठरला आहेत. स्पर्धेमध्ये सीबीएसई संघाने चार सुवर्ण पदक प्राप्त करीत तिसरे स्थान मिळविले. १९ वर्ष वयोगटामध्ये सीबीएसई संघाने प्रथम स्थान, तर १४ वर्ष वयोगटात उत्तराखंड संघाने विजय प्राप्त केला. १७ वर्ष वयोगटात महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करून पहिला क्रमांक प्राप्त केला. दरम्यान १४, १७ व १९ वर्ष वयोगटात महाराष्ट्र संघाचे प्रदर्शन उत्कृष्ट राहिले. समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

अकोल्याचा रेहान शाह ठरला ‘बेस्ट बॉक्सर’राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने अकोला क्रीडा प्रबोधनीचा बॉक्सर रेहान शाह हा १९ वर्ष वयोगटात ‘बेस्ट बॉक्सर’ ठरला आहे. समारोपीय कार्यक्रमात त्याला सन्मानित करण्यात आले. रेहान शाह याने स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केले. १४ वर्ष वयोगटामध्ये सीबीएसई संघाचा बॉक्सर हर्षील व १७ वर्ष वयोगटात हरियाणाचा बॉक्सर जतीन याने ‘बेस्ट बॉक्सर’चा खिताब मिळविला.

हे ठरले विजयी संघ१४ वर्ष वयोगटामध्ये झालेल्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी महाराष्ट्र, दुसऱ्या स्थानी हरियाणा, तर तीन सुवर्ण पदक जिंकून उत्तराखंड संघ विजयी ठरला. १७ वर्ष वयोगटात महाराष्ट्र संघ तृतिय, सीबीएसई संघ द्वितीय व तीन सुवर्ण पदक मिळवित हरियाणाचा संघ विजयी झाला. १९ वर्ष वयोगटात सीबीएसई संघ तृतिय, हरियाणाचा संघ द्वितीय, तर महाराष्ट्राचा संघाने अव्वल क्रमांक पटाविला.

टॅग्स :Akolaअकोला