शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धा ; सकरात्मक आणि नकारात्मक विचारांची घालमेल ‘दि कॉन्शन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:39 IST

सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची घालमेल ‘दि कॉन्शन्स’ या नाटकातून दाखविण्यात आली.

अकोला: सकारात्मक आणि नकारात्मक विचारांनी आपले मन भरलेले असते. यामध्ये आपण फरक करू शकत नाही. आपण जो विचार करतो, तेच प्रत्यक्ष जीवनात उतरविण्यात व्यस्त होऊन जातो; मात्र परिस्थिती आणि विचार हे वेगवेगळे असतात. सकारात्मक आणि नकारात्मक विचारांची घालमेल ‘दि कॉन्शन्स’ या नाटकातून दाखविण्यात आली.सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रविवारी प्रमिलाताई ओक हॉल येथे ‘दि कॉन्शन्स’ नाटक द्वारकाधीश बहूद्देशीय संस्था अकोलाच्यावतीने सादर करण्यात आले. या नाटकातील प्रमुख पात्राची तब्येत खराब असल्यावरही नाटक सादर करू न ‘शो मस्ट गो आॅन’चा प्रत्यय आजच्या नाटकाच्या सादरीकरणातून दिसून आला. नाटकातील प्रमुख पात्र मीरा गीताबाली उनवणे आणि श्यामचे पात्र मनीष उनवणे यांनी रंगविले. मनस्वीचे पात्र दत्तात्रय ठाकरे यांनी वठविले. नाटकाचे लेखक अमेय दक्षिणदास आहेत. दिग्दर्शन गीताबाली उनवणे यांनीच केले होते. पार्श्वसंगीत आशुतोष गिरी आणि प्रकाश व्यवस्था अनिल कुळकर्णी यांची होती. नेपथ्य आनंद जहागीरदार, रंगभूषा कांचन मालगे, अरुणा सक्रापुरे, वेशभूषा कांचन येन्नीवार, प्राची कुलट, ध्वनिमुद्रण श्रीयश उनवणे, रंगमंच व्यवस्थापन गजानन हिवरकर, महेंद्र मेश्राम यांचे होते, तर नाटकाला संजय राऊत, जितेंद्र गायकवाड, अजय चव्हाण, सोनाली शेंडे व श्रद्धा साठे यांचे विशेष साहाय्य लाभले.बॉक्स‘धंदेवाईक’ नाट्य प्रथमच हौशी रंगभूमीवर५८ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रथम फेरीत सोमवार, ३ डिसेंबर रोजी किरण बहूद्देशीय मंच, अकोलाद्वारे ‘धंदेवाईक’ हे नाटक सादर होणार आहे.व्यावसायिक रंगभूमीवर दिवंगत नाट्यकर्मी लालन सारंग व कमलाकर सारंग यांनी समाजातील वास्तवावर नेमकं बोट ठेवणारे हे नाटक सादर केले होते. या नाटकाचा प्रथमच प्रयोग किरण बहूद्देशीय मंच, अकोला यांच्या माध्यमातून हौशी रंगभूमीवर सादर होणार आहे. या नाटकाचे लेखन दत्ता केशव यांनी केले असून, दिग्दर्शन मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे. या नाटकातून समाजातील कथित प्रतिष्ठितांच्या बुरख्याला छेद दिला असून, वास्तव मोठ्या ताकदीने मांडले आहे. नाटकांकडे प्रेक्षकांची पाठसांस्कृतिक कार्य संचालनालयाने अकोलेकरांना उत्तम नाटकांची मेजवानी दिली आहे, तरीदेखील अकोलेकर प्रेक्षकांनी नाटकाकडे पाठ फिरविली आहे. अगदी बोटावर मोजण्याएवढे प्रेक्षक नाटकाला हजेरी लावत आहेत. 

 

टॅग्स :Akolaअकोलाcultureसांस्कृतिक