शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रीयन खेळाडूंचे पाऊल पडते पुढे!

By admin | Updated: August 28, 2016 23:08 IST

क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडूंचे सुयश; गत तीन वर्षांत १६६५ मेडलचे मानकरी.

संतोष वानखडेवाशिम, दि. २८ : क्रीडापटूंचे नैपुण्य विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने पुणे येथे स्थापन केलेल्या क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी गत तीन वर्षांत राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पधार्ंमध्ये तब्बल १६६५ मेडल प्राप्त केले आहेत. यामध्ये ६८५ सुवर्ण, ५७१ रजत आणि ४0९ कांस्य पदकांचा समावेश असल्याची नोंद क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या दप्तरी आहे.विद्यार्थी व युवकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या हेतूने राज्य सरकार गत काही वर्षांपासून क्रीडा धोरण राबवित आहे. पुस्तकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पधार्ंचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच खेळांना प्रोत्साहन देण्यासोबत खेळाडूंचे नैपुण्य विकसित करण्यासाठी राज्य शासनाने पुणे येथे शिवछत्रपती क्रीडापीठाची स्थापना केली आहे. या क्रीडापीठाकडून राज्यातील ८ ते १४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता क्रीडा कौशल्य चाचण्या घेतल्या जातात. निवड झालेल्या खेळाडूंना ८ ते १0 वर्षे आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते. राज्यात ११ क्रीडा प्रबोधिनी आहेत. या क्रीडा प्रबोधिनीतील प्रती विद्यार्थ्यांवर दरमहा नऊ हजार रुपये खर्च शासनातर्फे केला जातो. गत तीन वषार्ंत या प्रबोधिनीत एकूण दोन हजार खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धांचे धडे गिरविले. २0१५-१६ मध्ये ५९३ प्रशिक्षणार्थींची निवड झाली. गत तीन वर्षांतील या खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेऊन तब्बल १६६५ पदके प्राप्त केली आहेत. आतापर्यंत या प्रबोधिनीच्या २१ खेळाडूंनी शिव छत्रपती राज्य क्रीडा सन्मान प्राप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत गत तीन वर्षांत सहा सुवर्ण, ११ रजत व १४ कांस्य पदके मिळविली आहेत. राष्ट्रीय स्तर स्पर्धेत २३६ सुवर्ण, १९२ रजत आणि १२५ कांस्य पदके मिळविली. राज्यस्तरीय स्पर्धेत ४४३ सुवर्ण, ३६८ रजत आणि २७0 कांस्य पदके मिळविली असल्याची नोंद क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या दप्तरी आहे.