शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचा निर्णय लवकरच!

By admin | Updated: August 28, 2014 02:20 IST

विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याची तयारी

अकोला: विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागा लढविण्याची तयारी भारिप बहुजन महासंघप्रणीत महाराष्ट्र लोकशाही आघाडीने सुरु केली आहे. विविध घटक पक्ष सोबत घेऊन, आघाडीकडून निवडणूक लढविणार आहे. त्यासाठी कोणकोणते घटक पक्ष आघाडीत सहभागी होतील, याबाबतचा निर्णय शुक्रवारपर्यंत होण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. युती आणि आघाडीच्या राजकारणाचे वारे सर्वच पक्षांमध्ये वेगाने वाहू लागले आहेत. आघाडीच्या या राजकारणात आता भारिप बहुजन महासंघप्रणीत महाराष्ट्र लोकशाही आघाडीनेही उडी घेतली आहे. विविध घटक पक्षांना सोबत घेऊन, महाराष्ट्र लोकशाही आघाडीने राज्यातील विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. या आघाडीत कोणकोणते घटक पक्ष असतील, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट नसले तरी, यासंदर्भातील निर्णय शुक्रवार, २९ ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकशाही आघाडीने राज्यातील ३0 पेक्षा अधिक मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. अकोल्यासह सर्वच जागांवर आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्र लोकशाही आघाडी राज्यातील सर्व जागा लढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी राज्यातील समविचारी घटक पक्षांना आघाडीत सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र लोकशाही आघाडी विविध घटक पक्षांना सोबत घेऊन, राज्यातील सर्व जागा लढणार आहे. आघाडीचे घटक पक्ष कोणकोणते असतील, याबाबतचा निर्णय २९ ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे कार्यालय सचिव ज वि पवार यानी सांगीतले. *घटक पक्षांच्या निर्णयाकडे लागले लक्ष!भारिप-बमसंप्रणीत महाराष्ट्र लोकशाही आघाडीत राज्यातील समविचारी घटक पक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न आघाडीकडून सुरु आहेत. प्रामुख्याने समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय), मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीएम) व इतर काही पक्ष आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने घटक पक्षांच्या निर्णयाकडे राजकीय वतरुळाचे लक्ष लागले आहे.