शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजच्या प्रमुख बियाण्यांना अनुदान नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 01:50 IST

२५ मे रोजी उच्चस्तरीय बैठक; शेतकऱ्यांचे लागले लक्ष

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत (महाबीज) बियाण्यांचा पुरवठा करताना शेतकऱ्यांना अनुदान स्वरू पात प्रमुख पिकांचे बियाणे बाजारात उपलब्ध केले जाते. पण, यावर्षी १५ वर्षांवरील बियाण्यांचा अनुदान यादीत समावेश करण्यात आला नाही. यासंदर्भात आता २५ मे रोजी शासनासोबत महाबीजची बैठक होणार आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ६ लाख ५३ हजार क्ंिवटल विविध बियाण्यांचे नियोजन केले आहे. यातील ७० टक्के बियाणे बाजारात उपलब्ध केली आहेत. यामध्ये गळीत, तृण व कडधान्य बियाण्यांचा समावेश आहे. ही सर्व बियाणे हे १५ वर्षाआतील आहेत. या बियाण्यांना अनुदान देण्यासाठीची अनुमती शासनाने शनिवारी दिली आहे. (बियाणे निर्मितीपासून १५ वर्षांच्या आतील) परंतु शेतकऱ्यांची मागणी असलेले १५ वर्षांवरील सोयाबीन ३३५, उडीद टीएयू-१, तूर मारोती, आशा बीएसएमआर -५३६, मूग-कोपरगाव, धान-एमटीयू १०-१० या बियाण्यांचा अनुदान यादीत समावेश नाही. या संदर्भात २५ मे रोजी बैठक होणार आहे. या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, महाबीजचे यावर्षी सर्वच बियाण्यांचे दर हे २० टक्क्यांनी कमी केले आहेत. त्यामुळे सोयबीनचे बियाणे मागच्यावर्षी ६८ रुपये किलो होते. यावर्षी हे बियाणे ५७ रुपये किलोप्रमाणे उपलब्ध होणार आहे.अनुदानासाठी ठेवले ३० टक्के बियाणेमहाबीजने ७० टक्के बियाणे बाजारात उपलब्ध केले आहे. ३० टक्के बियाणे राखून ठेवले आहे. १५ वर्षांवरील बियाण्यांबाबत २५ मे रोजीच्या बैठकीत जो निर्णय होईल, त्यानंतर उर्वरित बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे.परमिटचा वाद अनुदान देण्यात येणाऱ्या बियाण्यांसाठी याअगोदर शासनाकडून (कृषीविभाग) शेतकऱ्यांना कुपन (परमिट) दिले जात होते. मागील काही वर्षांपासून परमिट देणे बंद आहे. परंतु मागील वर्षी झालेला हरभरा बियाण्यांचा घोळ बघता, बियाणे विक्रेत्यांनी यावर्षी परमिट मुद्दा उचलून धरला आहे. परमिट असेल, तरच बियाणे विकणार, अशी भूमिका घेतली आहे. याची तीव्रता अकोला जिल्ह्यात अधिक आहे.आतापर्यंत ७० टक्के बियाणे बाजारात उपलब्ध केले असून, उर्वरित बियाणे २५ मे च्या बैठकीनंतर उपलब्ध केले जाणार आहे. यावर्षी २० टक्के कमी दराने ही बियाणे उपलब्ध केली आहेत. काही ठिकाणी परमिटबाबत विक्रेते अडून आहेत. हा प्रश्न सुटल्यास बियाणे विक्रीचा मार्ग मोकळा होईल.- रामचंद्र नाके,महाव्यवस्थापक, विपणन, महाबीज, अकोला.