शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सनदी अधिकाऱ्यांना ‘महाबीज’चे वावडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:13 IST

अकोला : शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करण्यात महत्त्वाचे असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) सनदी अधिकाऱ्यांना चांगलेच वावडे आहे. सौरभ ...

अकोला : शेतकऱ्यांना बियाण्यांचा पुरवठा करण्यात महत्त्वाचे असलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) सनदी अधिकाऱ्यांना चांगलेच वावडे आहे. सौरभ विजय यांच्यानंतर गत ११ वर्षांच्या काळात तब्बल १७ वेळा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे हे पद आयएएस अधिकाऱ्यांना नको असल्याचे दिसून येत आहे.

बियाण्यांचे उत्पादन, प्रक्रिया, प्रमाणीकरण, गुणवत्ता नियंत्रण, विपणन व विक्री हे सर्व कार्य महाबीजमार्फत केले जाते. महाबीजचे मुख्यालय हे अकोल्यात असून या महामंडळाची सर्वस्वी जबाबदारी व्यवस्थापकीय संचालकाची असते. या पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. काही मोजके अधिकारी सोडता इतर अधिकारी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहिले नाही. डिसेंबर २०२० मध्ये अनिल भंडारी यांची बदली झाल्यानंतर जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली. ते १७ फेब्रुवारीला रुजू झाले; परंतु अवघ्या आठवडाभरात त्यांची औरंगाबादमध्ये सेल्स टॅक्स विभागात नियुक्ती झाली. त्यांच्या जागेवर राहुल रेखावार यांची नियुक्ती केली. तेही महिनाभरानंतर रुजू झाले. तीन महिन्यांतच रेखावार यांची बदली झाली. त्यामुळे या पदाबाबत असलेली उदासीनता पुन्हा दिसून आली.

असा आहे महाबीजमध्ये अधिकाऱ्यांचा कार्यकाळ

महाबीजच्या ४५ वर्षांच्या कार्यकाळात आतापर्यंत ३२ अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालकपदावर नेमणूक करण्यात आली. टी. बालारमण महाबीजचे पहिले एमडी होते. त्यानंतर, व्ही. रंगनाथन हे एमडी झाले. व्ही.एस. धुमाल, डॉ. प्रदीप व्यास या अधिकाऱ्यांनी चार वर्षांचा, तर सौरभ विजय यांनी तीन वर्षे १० महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर, एमडीपदावर बहुतांश अधिकारी दोन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकले नाहीत.

शासनाकडून दुर्लक्षित

नफ्यात चालणारे हे शेतकऱ्यांचे महामंडळ आयएएस अधिकाऱ्यांना इतके नापसंतीचे ठिकाण का झाले असावे, याबाबत शेतकऱ्यांमध्येही आश्‍चर्य व्यक्त होत आहे; मात्र शासनाकडूनही हे महामंडळ दुर्लक्षित होत असल्याचे दिसून येत आहे.

सात-आठ वर्षांपासून एमडीपदावर अधिकारी टिकूनच राहत नाही. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण वर्ण असलेल्या या महामंडळात एखादा एमडी म्हणून अधिकारी रुजू झाल्यास त्याला तीन वर्षांचा काळ पूर्ण करण्याची सक्ती केली पाहिजे. शासनाने याकडे लक्ष द्यावे.

- वल्लभराव देशमुख, संचालक, महाबीज, अकोला

पद रिक्तच!

काही दिवसांआधी राज्यात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर कुणाचीही नेमणूक झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हे पद अधांतरी लटकले आहे. या पदावर अद्याप कोणाची नेमणूक होणार, याकडे लक्ष लागले आहे.