शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजच्या आमसभेत हलकल्लोळ!

By admin | Updated: December 29, 2014 23:54 IST

भागधारक शेतक-यांची भोजनाची अपुरी व्यवस्था, खुच्र्यांची फेकाफेक.

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) आमसभेत भागधारक शेतकर्‍यांची भोजनाची अपुरी व्यवस्था झाल्याने एकच हलकल्लोळ उडाला. दूरवरू न आलेल्या भागधारकांना भोजन मिळाले नसल्याने आणि लाभांशाच्या मुद्दय़ावर संतप्त शेतकर्‍यांनी खुच्र्यांची फेकाफेक करू न नाराजी व्यक्त केली तसेच लोकप्रतिनिधी, महाबीज प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. महाबीजची ३७ वी आमसभा अकोला येथील मुख्यालयी २९ डिसेंबर रोजी घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल होते. व्यासपीठावर आमदार रणधीर सावरकर, महाबीजचे संचालक खासदार संजय धोत्रे, वल्लभराव देशमुख, महाबीजचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश्‍वर राजूरकर, महाबीजचे महाव्यवस्थापक (प्रक्रिया) डॉ. विनोद काळबांडे आदींची उपस्थिती होती. या सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. तोपर्यंत सर्व शांत होते. भोजन अवकाशात मात्र भागधारक शेतकर्‍यांची भोजनाची पुरेपूर सोय न झाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी महाबीज प्रशासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत खुच्र्यांची फेकाफेक केली. यानंतर पुन्हा सभेला सुरुवात झाली तेव्हा संतप्त भागधारकांनी लाभांशाच्या मुद्दय़ावर प्रशासन व संचालक मंडळाला धारेवर धरले. प्रमोद गावंडे यांनी तर आमदार रणधीर सावरकर यांना व्यासपीठावरू न खाली उतरवण्यासाठी प्रचंड नारेबाजी केली. त्यामुळे महाबीज मुख्यालयात गोंधळ निर्माण झाला. सभेसाठी टाकण्यात आलेला शामियानाची ओढाताणही करण्यात आली. याबाबत आ. सावरकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, ते म्हणाले की महाबीजचा भागधारक, बिजोत्पादक, शिवाय आमदार असल्याने मला व्यासपीठावर पाचारण करण्यात आले होते. तथापि एका शेतकर्‍याने याबाबत हरकत घेतली. लोकशाहीत सर्वांनाच बोलण्याचा अधिकार असल्याने मी व्यासपिठाच्या खाली उतरलो. पण, लगेच पुन्हा मला व्यासपिठावर बोलावण्यात आल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी सांगीतले.