शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अकाेल्यात महाआराेग्य शिबिरास प्रारंभ; देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2023 16:43 IST

श्री राजराजेश्वर मंदिराला पर्यटनाचा दर्जा देणार

- राजरत्न सिरसाट

अकाेला : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी अकाेल्यात महाआरोग्य शिबिराचे उदघाटन केले. या शिबिरात सुमारे २५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांनी विस्तारीत शहीद स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विविध घाेषणांसह अकाेल्याच्या श्री राजराजेश्वर मंदिराला पर्यटनाचा दर्जा देण्याची घाेषणा केली.

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात सात व आठ ऑक्टोबर असे दोन दिवसीय महाआरोग्य शिबिर आयोजनात आले असून या शिबिराच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस व अलीकडेच नियुक्त पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अकोल्यात आगमन झाले होते. अकोला विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यावर पोलीस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले, त्यानंतर १९५२ ते २०२३ पर्यंत प्राणाची आहुती देणारे, विरगती प्राप्त झालेले हुतात्मा यांच्या स्मारकाचे विस्तारित कामाचे लोकार्पण झाले. 

सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलला ही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या समवेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आ.प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल, आ. अमोल मिटकरी,आ. राजेंद्र पाटणी, आ. लखन मलिक, माजी राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, शहराध्यक्ष जयंत मसने, अनुप धोत्रे, अनुप शर्मा, जि.प.अध्यक्षा सगताताई अढाऊ, आरोग्य उप संचालक डॉ. तरणतूषार वारे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. गाढवे, अमरावती महसूल आयुक्त श्रीमती निधी पांडे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. श्रीमती वैष्णवी, माजी आमदार बळीराम शिरसकार, सागर शेगोकार, देवाशिष काकड, माधव मानकर, संजय गोटफोडे आदी मंचावर उपस्थित होते. दरम्यान, नांदेड व नागपूर येथील आरोग्य बळींच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून आंदोलन होण्याच्या शक्यता लक्षात घेता शिवसेना अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :Akolaअकोला