शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी ‘माफसू’चे शेतकरी जनजागृती अभियान!

By admin | Updated: August 18, 2015 01:33 IST

विदर्भ-मराठवाड्यातील एक हजार गावांत शास्त्रज्ञ करणार प्रबोधन.

अकोला : शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने (माफसू) विदर्भ -मराठवाड्यातील एक हजार गावांत शेतकरी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतीला पुरक दुग्ध, कुक्कुट व पशुसंवर्धनाचा व्यवसाय करण्यासाठी माफ सूचे शास्त्रज्ञ शेतकर्‍यांचे प्रबोधन करणार आहेत. ग्रामीण भागात पूर्वी प्रत्येक शेतकर्‍याकडे पशुधन असायचे, किमान दोन गायी, म्हैस असायचीच; पण अलीकडे नगदी पिकांकडे (कॅश क्रॉप) शेतकरी वळल्याने गावागावांतील पशुधन कमी झाले आहे. या नगदी पिकांमुळे शेतातील चार्‍याचे उत्पादनच घटले आहे. परिणामी शेतकर्‍यांनी पशुधन कमी केले आहे; पण बदलत्या परिस्थितीत आता शेतीला पुरक उद्योगांची गरज निर्माण झाली असून, शेतकर्‍यांना आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिकेपासून परावृत्त करण्यासाठी ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय व इतर कृषीवर आधारित पुरक व्यवसाय सुरू करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने माफूसच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने विदर्भ-मराठवाड्यातील शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यासाठी शेतकरी जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिकेपासून शेतकर्‍यांना परावृत्त करण्याची गरज आहे. त्यासाठी विदर्भ- मराठवाड्यातील शेतकर्‍यांनी शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी शेतकरी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा खर्च स्वत: पशू शास्त्रज्ञ करणार असल्याचे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. एन.एन. झाडे यांनी सांगीतले.