शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील युवतीस ठेवले सुधारगृहात

By admin | Updated: January 10, 2017 02:24 IST

संभाजी ब्रिगेडने दिली युवतीस मदत.

अकोला, दि. ९- अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन खांब परिसरात एका युवतीला घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या युवकासह मध्य प्रदेशातील युवतीस संभाजी ब्रिगेडच्या मदतीने अकोट फैल पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र २४ तासांच्या वर कालावधी उलटला असतानाही पोलिसांनी सदर युवकावर कारवाई केलेली नाही. या प्रकरणातील युवतीला आई-वडील नसल्याचे समोर आल्यानंतर तिला सुधारगृहात ठेवण्यात आले असून संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष पवन महल्ले यांनी तिला आवश्यक ती मदत केली.अकोट येथील रहिवासी असलेला अशफाक नामक युवक आणि मध्य प्रदेशातील युवती नांदुरा येथे सोबतच कामाला होते. रविवारी सायंकाळी ही युवती मध्य प्रदेशात परत जाण्यासाठी निघाली; मात्र तिची पर्स हरवल्याने तिने सदर युवकाला फोन करून पैशाची मदत मागितली. मध्य प्रदेशात परत जाण्यासाठी सदर युवकाने तिला पैसे देण्याचे कबूल केले; मात्र अकोट फैलातील तीन खांब परिसरात एक मित्र पैसे देणार असल्याचे त्याने तिला सांगितले. अकोल्याची काहीही माहिती नसलेली युवती युवकावर विश्‍वास ठेवून त्याच्यासोबत जात होती; मात्र सदर युवती संभाजी ब्रिगेडचे पवन महल्ले व कार्यकर्त्यांना दिसल्यानंतर त्यांनी विचारपूस केली. युवतीने सदर माहिती त्यांना सांगितली; मात्र युवक तिला ज्या परिसरात नेत होता तो परिसर जंगल आणि मद्यधुंद युवकांचा अड्डा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महल्ले यांनी पोलिसांना माहिती दिली. अकोट फैल पोलिसांनी घटनास्थळ गाठून युवकाला ताब्यात घेतले, तसेच युवतीला सुधारगृहात पाठविले. तिच्या कुटुंबीयांची माहिती घेतली असता तिला आई-वडील नसल्याचे समोर आले. पवन महल्ले व अन्य कार्यकर्त्यांंनी ही समयसूचकता दाखविली नसती तर युवतीच्या आयुष्याची राखरांगोळी झाली असती; मात्र एवढे असतानाही पोलिसांनी सदर युवकावर सोमवारी रात्रीपर्यंत ठोस कारवाई केली नव्हती.