शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

लक्झरीने दुचाकीस्वारास चिरडले

By admin | Updated: June 8, 2015 01:38 IST

अकोली येथील दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू.

अकोला - शहरातून पातूरकडे जात असलेल्या हिमालया ट्रॅव्हल्सच्या एका लक्झरी बसने अकोली खुर्द येथील दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान हॉटेल जयराज बारनजीक घडली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. जुने शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी येण्यास दिरंगाई केल्याने या इसमाचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रत्यक्षदश्रींनी केला. आकोली खुर्द येथील रहिवासी साबळे नामक इसम त्यांच्या एम एच २८ डब्ल्यू ६५५९ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना त्यांच्या दुचाकीला औरंगाबाद येथील हिमालया ट्रॅव्हल्सच्या एका लक्झरीने पातूर रोडवरील जयराज बारनजीक जबर धडक दिली. या अपघातात साबळे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांनी आरडा-ओरड केली. मात्र, या रोडवरून जाणार्‍या एकाही वाहनाने त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची तसदी घेतली नाही. या अपघाताची माहिती छावाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे यांना मिळताच त्यांनी जुने शहर पोलिसांना माहिती देऊन घटनास्थळ गाठले. मात्र, जुने शहर पोलीस तब्बल अर्धा तासा उलटल्यावरही दाखल न झाल्याने साबळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर साबळे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात लक्झरी बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.