शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

बंधूप्रेमापेक्षा प्रियकराचे प्रेम वरचढ!

By admin | Updated: June 2, 2017 01:49 IST

भावाचे प्रयत्न निष्फळ: पाणावल्या डोळ्यांनी भाऊ परतला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आईचे निधन झाल्यानंतर सावत्र भावाने तिचा सांभाळ केला. सख्ख्या बहिणीपेक्षाही तिच्यावर प्रेम केले. तिला हवे ते दिले. शिक्षणासाठी अकोल्यात पाठविले. सख्ख्या बहिणीसारखे प्रेम देऊन भावाने आपल्यासाठी केलेल्या कर्माची जाण न ठेवता, बहिणीने प्रियकराला जवळ केले. बंधूप्रेमासमोर तिचे प्रियकरावरील प्रेम वरचढ ठरले. एखाद्या चित्रपटातील कथानक वाटावी अशीच घटना गुरुवारी उशिरा रात्री सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात घडली. रिसोड येथे राहणाऱ्या भावाने आईच्या निधनानंतर सावत्र बहिणीचा सांभाळ केला. तिला सर्वकाही दिले. शिक्षणासाठी तिला अकोल्यात पाठविले. शिक्षण घेताना, बहिणीचे न्यू तापडिया नगरातील एका युवकासोबतच प्रेमसंबंध जुळले. दोघेही प्रेमात आकंठ बुडाले. सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या. बहिणीच्या प्रेमप्रकरणाची माहिती भावाला मिळाल्यावर त्याने तिची समजूत घातली; परंतु बहिणीने तिच्या मनाप्रमाणेच वागायचे ठरविले. अशातच दोघे लग्न करणार असल्याची माहिती भावाला मिळाली. त्याने गुरुवारी सायंकाळी अकोला गाठले. अकोल्यात आल्यावर सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात धाव घेत, बहिणीची प्रियकराच्या ताब्यातून सुटका करण्याची विनंती केली. पोलिसांनी बहीण व तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी भावाने बहिणीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु बहीण दोन दिवसाच्या प्रेमापुढे भावाला भीक घालत नव्हती. तिने आम्ही दोघांनी लग्न केल्याचे पोलिसांना सांगितले. बहीण सज्ञान असल्याने, पोलिसांना कारवाई करता आली नाही. भावाने तिला घरी चलण्याची विनंती केली; परंतु बहिणीने भावाला स्पष्ट नकार देत, प्रियकराला जवळ केले. भावाच्या प्रेमापुढे प्रियकराचे प्रेम वरचढ ठरले. भावाने पाणावल्या डोळ्यांनी पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला.