शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कमावता व्यक्ती गमावला; जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना मदतीचा आधार; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By संतोष येलकर | Updated: December 22, 2023 18:43 IST

वारसांच्या खात्यात जमा होणार

अकाेला : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबास २० हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली जाते. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत कुटुंबातील कमावता व्यक्ती गमावलेल्या जिल्ह्यातील कुटुंबांना सानुग्रह मदत वितरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी गुरुवारी दिला. त्यामुळे कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ३१६ कुटुंबांतील वारसांच्या खात्यात लवकरच सानुग्रह मदतीची रक्कम जमा करण्यात येणार असून, संबंधित कुटुंबांना मदतीचा आधार मिळणार आहे.

शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत दारिद्र्यरेषेखालील गरीब कुटुंबांतील कमावत्या आणि कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास वर्षभरात संबंधित कुटुंबास वीस हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली जाते. त्यानुसार गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या कुटुंबातील वारसांकडून संबंधित तहसील कार्यालयांकडे सानुग्रह मदतीसाठी अर्ज करण्यात आले. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडे प्राप्त झालेल्या अर्जानुसार गरीब कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ३१६ कुटुंबांना सानुग्रह मदत वितरित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुंभार यांनी २१ डिसेंबर रोजी दिला. मदतीची ही रक्कम तहसील कार्यालयामार्फत कमावती व्यक्ती गमावलेल्या संबंधित कुटुंबातील वारसांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

मदत मंजूर केलेल्याकुटुंबांची अशी आहे संख्या !तालुका संख्याअकोला शहर ६०अकोला ग्रामीण ५०बार्शिटाकळी १४अकोट ५५तेल्हारा ४२बाळापूर २५पातूर ३०मूर्तिजापूर ४०राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील ३१६ कुटुंबांना सानुग्रह मदत वितरित करण्याचा आदेश दिला आहे. सानुग्रह मदतीची रक्कम जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमार्फत संबंधित कुटुंबातील वारसांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.अजित कुंभार,जिल्हाधिकारी, अकोला

टॅग्स :Akolaअकोला