शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पंदेकृविचे ३0 टक्क्यांच्यावर नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:24 IST

समान काम, समान वेतन मागणीसाठी डॉ. पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी मजुरांनी मागील २३ दिवसां पासून काम बंद आंदोलन सुरू  केल्याने कृषी विद्यापीठाच्या हजारो हे क्टरवरील पिके प्रभावित झाली असून, जवळपास ३0 ते ३५ टक्के उत् पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देमजुरांच्या संपाचा परिणामखरीप पिके हातची गेली!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : समान काम, समान वेतन मागणीसाठी डॉ. पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी मजुरांनी मागील २३ दिवसां पासून काम बंद आंदोलन सुरू  केल्याने कृषी विद्यापीठाच्या हजारो हे क्टरवरील पिके प्रभावित झाली असून, जवळपास ३0 ते ३५ टक्के उत् पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. ‘समान काम, समान वेतन’ लागू करू न थकबाकी देण्यात यावी, या  मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच  रोजंदारी मजुरांनी मागील २३ दिवसांपासून काम बंद आंदोलन  पुकारल्याने कृषी विद्यापीठाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान  होत आहे. मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मुगाचे पीक  वाळले होते. कृषी विद्यापीठाच्या सर्वच क्षेत्रावर रात्रीची गुरे सर्रास  सोडली जात असल्याने उभे पीक गुरांनी फस्त केले आहे. मूग  काढण्यासाठी  मजूरच नसल्याने मुगाच्या शेंगा गळून पडल्या असून,  या पिकाचे नुकसान झाले आहे.  इतरही संशोधनाची कामे प्रभावित  झाली आहेत. केंद्र सरकारने पारित केलेला कायदा १९७६ कलम ४ अन्वये तसेच  सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे सर्व कृषी विद्यापीठात हे वेतन  दिले जात आहे. तथापि, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या  रोजंदारी मजुरांना समान वेतन देण्यास टाळाटाळ केली जात  असल्याचा आरोप करीत मजुरांनी काम बंद आंदोलन सुरू   केले  आहे. विद्यापीठाच्या बाराही विभागांतील रोजंदारी मजुरांचे कृषी विद्या पीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर हे आंदोलन सुरू  आहे. जोपर्यंत  मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार  नसल्याचा निर्धार संघटनेच्या नेत्यांनी केला आहे.कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर यावर्षी मूग  बीजोत्पादनासाठीचा आहे. अनेक भागात हे पीक विरळ झाले आहे.  काही भागात मूग हिरवा आहे. त्यावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.  देशी बीटी कापसावर फवारणी करण्यासाठी मजूर नसल्याने त्यावरही  प्रतिकूल परिणाम होत आहेत.