शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ओवेसी बंधूंच्या विखारी प्रचारामुळे मुस्लीमांचे नुकसान - माजीद मेमन

By admin | Updated: February 16, 2017 20:46 IST

मुस्लीम समाजाला भेडसावणाºया प्रश्नांची उकल न करता जाहीर सभांमधून केवळ विखारी प्रचार करण्याचे काम एमआयएमच्या

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 16  - मुस्लीम समाजाला भेडसावणाºया प्रश्नांची उकल न करता जाहीर सभांमधून केवळ विखारी प्रचार करण्याचे काम एमआयएमच्या दोन्ही उच्चशिक्षीत ओवेसी बंधूंनी सुरू केले आहे.  ओवेसी बंधूंच्या कार्यशैलीमुळे मुस्लीम समाजाचे नुकसान होत असल्याचे टिकास्त्र राकाँचे खासदार अ‍‍ॅड.माजीद मेमन यांनी सोडले. गुरुवारी मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
राज्यातील दहा महापालिकांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल दमदार राहील. मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये वाक्युध्द रंगले असून कालपर्यंत गळ्यात गळे घालून सत्तेची फळे चाखणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्धव ठाकरे एकमेकांचे जाहीर सभांमधून वाभाडे काढत असल्याची टिका खा.अ‍‍ॅड.माजीद मेमन यांनी केली. राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजप-शिवसेनेला सर्वसामान्य जनतेचा विसर पडला असून कोण खरा व कोण खोटा हे सिध्द करण्याची जणू स्पर्धाच रंगली असल्याचे अ‍‍ॅड.मेमन यावेळी म्हणाले. सत्ताधाºयांच्या भूमिकेमुळे सर्वसामान्य जनता संभ्रमात असून ‘अच्छे दिन’च्या वल्गना कधीच्याच हवेत विरल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा मतदार राजा राष्ट्रवादी काँग्रेसला पसंती देणार असून विकासाच्या मुद्यांवरच पक्ष निवडणूक लढवत असल्याचे अ‍‍ॅड.मेमन यांनी स्पष्ट केले. ‘ट्रिपल’तलाकच्या मुद्यावर केंद्र सरकारने मुस्लीम समाजातील महिलांच्या भावना समजून घ्याव्यात. महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र त्यापूर्वी महिलांची मते विचारात घेऊन केेंद्र सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा,असेही अ‍‍ॅड.मेमन यांनी सांगितले.