शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने शेतक-यांचे नुकसान

By admin | Updated: February 11, 2017 02:41 IST

शेतक-यांना मोबदला द्या; आमदार सिरस्कार यांची मागणी.

बाळापूर (अकोला), दि. १0- राष्ट्रीय महामार्ग क्र. सहाच्या चौपदरीकरणासाठी बाळापूर तालुक्यातील ४५ हेक्टर ८६ आर जमीन संपादित केली. मात्र चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने शेतकर्‍यांना संपादीत शेतीचा पूर्ण मोबदला व शेती उत्पन्नापासून मुकावे लागल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याचा आरोप आमदार बळीराम सिरस्कार यांनी १0 फेब्रुवारी रोजी पारस येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.राष्ट्रीय महामार्ग क्र. सहामध्ये बाळापूर तालुक्यात रिधोरा ते जिल्हा हद्द (तरोडा शिवार) पर्यंत ३0 कि. मी.च्या रस्त्याचा अंतर्भाव आहे. या महामार्गाच्या दुतर्फा ४५ हेक्टर ८६ शेतजमीन संपादित करण्यात आली. त्यासाठी प्रशासनाच्यावतीने ३४ हेक्टरचा पहिला अवॉर्ड व ११ हेक्टरचा दुसरा अवॉर्ड करून शेतीचा अल्प मोबदला देण्यात आला.४५ हेक्टर ८६ आर जमीन ४३४ शेतकर्‍यांची असून, त्यांना दोन वर्षांपासून शेतीचा उर्वरित मोबदलाही मिळाला नाही, तसेच त्यांचे शेतीचे उत्पन्न डुबल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मागील दोन वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. महामार्गाच्या दुतर्फा मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले, त्यामुळे पर्यावरणाचा मोठा र्‍हास होत आहे. शासनाने तातडीने चौपदरीकरण पूर्ण करावे, अन्यथा संपादित जमिनींची वहिती शेतकर्‍यांना करू द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बाळापूर मतदारसंघात सिंचन क्षेत्रवाढीसाठी आवश्यक नैसर्गिक क्षेत्र उपलब्ध आहे. मनारखेड, बाळापूर येथे पारस वीज निर्मिती प्रकल्पाची दोन धरणे आहेत. नेरधामणा, कवठा बॅरेज, नया अंदुरा येथील प्रकल्पांची ८0 टक्के कामे पूर्णत्वास झाली आहेत; परंतु तापी महामंडळाचा अहवाल शासनाला पोहोचला नसल्याने उर्वरित काम निधीअभावी रखडले आहे. २0 टक्के काम पूर्ण करण्याची हमी संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनी देण्यास तयार आहे. कन्स्ट्रक्शन कंपनीने काम बंद केल्याने मजुरांच्या हातांना काम नाही. जलयुक्त शिवार योजना पाण्याची पातळी वाढण्यासाठी चांगली असली, तरी काही शेतकरी बांधव या योजनेची कामे करण्यास तयार नाहीत. भविष्यात भूगर्भातील पाण्याची पातळी आटल्यास भावी पिढीला पाण्यापासून मुकावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून भूगर्भात पाणी पातळी वाढविण्यासाठी सहकार्य करून सदर योजना पूर्णत्वास नेण्याचे आवाहन आमदार सिरस्कार यांनी केले.बाळापूर येथील प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून अर्थसंकल्प अधिवेशनात आवश्यक इमारत निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंजूर करून घेऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले. पत्रकार परिषदेला भारिप बमसंचे संतोष सुरोसे, श्याम खोपडे आदी उपस्थित होते. वीज निर्मितीचा वाढीव प्रकल्प सुरू करा!पारस औष्णिक केंद्रांतर्गत वाढीव प्रकल्पासाठी ५00 हेक्टर शेतजमिनी ताब्यात घेतल्या. १000 मेगावॅट वीज निर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या पाण्यासाठी दोन मोठी धरणे बांधली आहेत. एवढे पाणी व जमीन पुरेशी असल्याने पारस येथे ५00 वीज मेगावॅट वीज निर्मितीचा वाढीव प्रकल्प सुरू करावा, अन्यथा शेतकर्‍यांची शेती त्यांना परत द्यावी व दोन्ही धरणातून परिसरातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी देण्यात यावे, अशी मागणी आमदार बळीराम सिरस्कार यांनी केली आहे.