शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर देयक थांबल्याने कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 01:44 IST

‘कॅफो’च्या हेकेखोरपणाचा कंत्राटदारांकडून निषेध

अकोला : जिल्हा परिषदचा सेसफंड आणि शासनाच्या निधीतून झालेल्या कामांची देयक ३१ मार्च आणि त्यापूर्वी सादर केल्यानंतरही ते अदा करण्यात हेकेखोरपणा करत निधी खर्च रोखण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी केलेल्या कामांची नऊ कोटी रुपयांपेक्षाही अधिक रकमेची देयके रखडली आहेत. या प्रकाराने कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांचा निषेध केला आहे.जिल्हा परिषदेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांच्या कार्यपद्धतीने संतप्त सभापती पुंडलिकराव अरबट यांना माहिती मिळण्यासाठी थेट मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना पत्र द्यावे लागले. अर्थ विभागाचे प्रमुख म्हणून अरबट यांना माहिती न देता त्यांच्यावर लेखी स्वरूपात माहिती मागण्याची वेळ या विभागाच्या प्रशासकीय प्रमुख गीता नागर यांनी आणली. त्यातून नागर पदाधिकार्‍यांना जुमानतच नसल्याचे पुढे आले. त्यामुळे अरबट यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. आधी माहिती न देताच पदाधिकार्‍यांना तक्रार करण्यास भाग पाडणार्‍या नागर यांनी आता त्या पत्राचा आधार घेत निधी खर्चाचा अखेरचा दिवस ३१ मार्च रोजीच होता. त्यामुळे आता देयक अदा केली जाणार नाहीत, असे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी विधळे यांना सोमवारी सायंकाळी दिले. ही बाब जिल्हा परिषद कंत्राटदार आणि अभियंता असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना समजताच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे धाव घेतली. यावेळी आमदार रणधीर सावरकर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, गोपाल कोल्हे, शोभा शेळके उपस्थित होत्या. यावेळी कंत्राटदारांसोबतच सदस्यांनी ३१ मार्च रोजी सायंकाळपर्यंत जिल्हा परिषदेत प्राप्त देयक अदा करण्याची मागणी केली. मात्र, नागर यांनी खर्च त्याच दिवशी बंद केल्याचे पत्र दिले. आता देयक अदा करणार नाही, असा पवित्रा घेतला. खर्च होण्याच्या तारखेपूर्वी देयक सादर आहेत, ती दिलीच पाहिजे. नागर हेकेखोरपणा करून ती देण्यात दिरंगाई करत आहेत, असे यावेळी सर्वांनी सांगितले. त्यांच्या या कार्यपद्धतीचा कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मनिराम टाले यांच्यासह सर्वांनी निषेध केला. खर्च न होण्याला अधिकारी जबाबदार - कोल्हेशासन निधीचा खर्च करण्याची पद्धत ठरली आहे. त्यानुसार निधी खर्च झाला नाही. त्याला सर्वसंबंधित अधिकारी जबाबदार असल्याची तक्रार पंचायत राज समितीकडे करू, असे सदस्य गोपाल कोल्हे यांनी सांगितले. तांत्रिक कारणासाठी देयके रोखणे अयोग्य - सावरकरसंबंधित कंत्राटदारांनी जिल्हा परिषदेने मंजूर केलेली कामे पूर्ण केली आहेत. त्यासाठी खर्च झाला आहे. केवळ तांत्रिक कारणासाठी देयक रोखणे योग्य नाही, असे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.