शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

व्यापा-याला मारहाण करून लुटली साडेपाच लाखांची रोकड

By admin | Updated: November 14, 2014 01:09 IST

अकोल्यातील दूध डेअरीजवळ भरदिवसा घडला प्रकार.

अकोला : दुकानावर जाण्यासाठी घरून निघालेल्या बिडी व्यापार्‍यावर लोखंडी पाइपने हल्ला करून त्यांच्याकडील साडेपाच लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तोष्णीवाल ले-आउटमधील शनी मंदिराजवळ घडली. दुचाकीवर आलेल्या अज्ञात युवकांनी व्यापार्‍यावर हल्ला करून त्यांच्याकडील रोकड असलेली बॅग हिसकली आणि ते पसार झाले. दिवसाढवळय़ा घडलेल्या या प्रकाराने चोरट्यांचे बळ वाढल्याचे स्पष्ट केले आहे.तोष्णीवाल ले-आउट परिसरामध्ये राहणारे पंकज जयंतीभाई पटेल (४८) यांचे टिळक रोडवरील श्रावगी टॉवर्समध्ये शारदा उद्योग नावाचे प्रतिष्ठान आहे. नेहमीप्रमाणे पंकज पटेल हे दुकानावर जाण्यासाठी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एमएच ३0 एजे ६६३0 क्रमांकाच्या मोटारसायकलने बाहेर पडले. तोष्णीवाल ले-आउटमधील शनी मंदिराजवळ आल्यावर दुचाकीवर असलेल्या तीन अज्ञात युवकांनी अचानक त्यांच्या लोखंडी पाइपने हल्ला चढविला. बेसावध असल्याने पटेल हे वाहनासह जागेवर कोसळले. अधिक वेळ न दडवता, अज्ञात युवकांनी त्यांच्या हातातील बॅग हिसकून पळ काढला. दरम्यान घटनास्थळावर इतर व्यापारीही पोहोचले. त्यांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेबाबत माहिती दिली. पटेल यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात युवकांवर भादंवि कलम ३९२(३४) नुसार गुन्हा दाखल केला. व्यापार्‍यांनीच जखमी अवस्थेतील पंकज पटेल यांना पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर लगेच त्यांना सर्वोपचार रुग्णालय व नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी लुटारूंना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे. अद्याप पोलिसांना काहीही सुगावा लागला नाही.