शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत अकोला आवृत्तीचा वर्धापन दिन सोहळा थाटात

By admin | Updated: March 18, 2016 02:22 IST

आवृत्तीच्या नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन, मान्यवरांची मांदियाळी.

अकोला : व-हाडच्या मातीशी, शेतकर्‍यांशी जिवाभावाचे नाते जोडलेल्या 'लोकमत'च्या अकोला आवृत्तीचा १८ वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. यावेळी स्नेहनगर (गीतानगर) स्थित 'लोकमत'च्या मुख्य कार्यालयाचे रीतसर उद्घाटनही करण्यात आले. या स्नेहमीलन सोहळय़ास सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावून 'लोकमत'वर शुभेच्छांचा वर्षाव केला.'लोकमत'च्या अकोला आवृत्तीचा १८ वा वर्धापन दिन आणि नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन असा दुग्धशर्करायोग यावेळी जुळून आला. नूतन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी फीत कापून केले. यावेळी महापौर उज्ज्वला देशमुख, माजी महापौर सुमनताई गावंडे, ह्यलोकमतह्णच्या जाहिरात विभागाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आसमान सेठ, अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवि टाले, सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, 'लोकमत समाचार'चे प्रभारी अरुणकुमार, उप वृत्तसंपादक राजू ओढे आदी उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून 'लोकमत'चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.स्नेहमीलन सोहळय़ास माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, माजी राज्यमंत्री अजहर हुसैन, ज्येष्ठ नाट्यकलावंत राम जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, उपमहापौर विनोद मापारी, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. 'लोकमत' कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या स्नेहमीलन सोहळय़ाला 'संगीत रजनी'ने स्वरसाज चढवला. सेव्हन स्टार म्युझिकल ग्रुपच्या गायकांनी सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रमाला रंगत चढली.उपविभागीय अधिकारी खडसे आणि घोंगडेंच्या गीतांची रंगतस्नेहमीलन सोहळय़ातील 'संगीत रजनी'चा स्वरसाज ऐकून उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांनाही गाण्याचा मोह आवरला नाही. एक कुशल अधिकारी म्हणून ख्यातिप्राप्त असलेल्या खडसे यांच्यातील दडलेला गायक यानिमित्ताने उपस्थितांनी प्रत्यक्ष अनुभवला. घोंगडे यांच्यातील व्यंगचित्रकार, नकलाकार अकोलेकरांनी नेहमीच अनुभवला; परंतु 'लोकमत'च्या वर्धापन दिन सोहळय़ामध्ये घोंगडे यांनी बहारदार गायन करून उपस्थितांची मने जिंकली. रेषांना हसरं करून त्यांना साज चढविणार्‍या घोंगडे यांनी स्वरांनाही यावेळी साज चढविला.