शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: विकास कामांचे फलक झाकण्यासाठी मनपाची धांदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:37 IST

अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच शहरातील राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज, बॅनर हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची चमू सरसावली.

अकोला: लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच शहरातील राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज, बॅनर हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची चमू सरसावली. दोन दिवसांत शहराच्या कानाकोपऱ्यातील राजकीय होर्डिंग्ज हटविल्यानंतर आता प्रभागात गल्लोगल्लीत लावण्यात आलेल्या विकास कामांचे फलक झाकण्यासाठी मनपाची चांगलीच धांदल उडाली आहे. विकास कामांचे फलक झाकण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचीसुद्धा धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे.‘अमृत’योजनेच्या माध्यमातून शहरात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. सिमेंट रस्ते, एलईडी पथदिव्यांसाठी शासनामार्फत कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. यादरम्यान, हद्दवाढीतील विकास कामांसाठी ९७ कोटींच्या निधीतून विकास कामांचा श्रीगणेशा झाला आहे. एकूणच, ही सर्व कामे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिकेतील सत्तापक्षाने निकाली काढली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर शहरात विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा व उद्घाटनाचा धडाका सुरू होता. आमदारांच्या निधीतून केलेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी होर्डिंग्ज-बॅनर व गल्लीबोळात विकास कामांचे फलक लावण्यात आले. यात भरीस भर शहराच्या विविध भागात अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झाल्याने शहराचे विद्रूपीकरण झाल्याचे चित्र समोर आले. रविवारी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच महापालिक ा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशानुसार रविवारी रात्री मुख्य रस्ते, मुख्य चौकांतील राजकीय होर्डिंग्ज-बॅनर हटविण्याची कारवाई करण्यात आली. सोमवारीसुद्धा मुख्य चौक, रस्त्यांवरील होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम सुरू होती. या कामासाठी चारही क्षेत्रीय अधिकारी व अतिक्रमण विभागाची चमू कार्यरत असल्याचे दिसून आले. यादरम्यान, गल्लीबोळात लावण्यात आलेल्या भूमिपूजनाच्या पाट्या,फलकांवर कागद लावणे आवश्यक आहे. अशा फलकांची संख्या जास्त असल्याने महापालिका प्रशासनाच्या यंत्रणेची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र आहे.पाटी-फलकांना लावले कागदशहराच्या विविध भागात रस्ते, एलईडी पथदिवे आदी विकास कामांच्या भूमिपूजनाचे व उद्घाटनाचे असंख्य फलक व पाट्या लावण्यात आल्या आहेत. त्यावर लोकप्रतिनिधींच्या नावाचा उल्लेख आहे. आचारसंहिता लागू होताच मनपा प्रशासनाने असे फलक व पाट्या झाकण्यासाठी कागदाचा वापर केला. फलकांची संख्या जास्त असल्याने ही मोहीम आणखी दोन दिवस चालणार असल्याचे संकेत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक