शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतमध्ये ३८0 प्रकरणांत समेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 14:52 IST

लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली ५ हजार ८८0 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३८0 प्रकरणांमध्ये समेट घडून आला.

अकोला: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार ८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी, कामगार, सहकार, कौटुंबिक व औद्योगिक न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित असलेली ५ हजार ८८0 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३८0 प्रकरणांमध्ये समेट घडून आला. तडजोड प्रकरणात ४ कोटी २0 लाख ३७ हजार ७१७ रुपये रक्कम वसूल करण्यात आली.जिल्ह्यातील सर्व दिवाणी व फौजदारी, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय येथे १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ५ हजार ८८0 प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी ३८0 प्रकरणांत समेट घडवून आणण्यात आला. समेट घडवून आणलेल्या प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी, मोटर वाहन अपघात, धनादेश अनादर प्रकरणाचा समावेश होता. याकरिता सर्व पॅनलवर पॅनल सदस्य म्हणून न्यायाधीश, अधिवक्ता व समाजसेवक यांनी काम पाहिले. लोकअदालतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे, जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश एस. एस. बोस, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक ए. एस. लव्हाळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक सज्जाद अहमद, श्रीहरी टाकळीकर, वरिष्ठ लिपिक, व्ही. आर. पोहरे, कुणाल पांडे, कनिष्ठ लिपिक व मो. शरीफ व शाहबाज खान यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय