शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

लोणारच्या बोकडाला दुबईत मागणी !

By admin | Updated: December 23, 2014 00:05 IST

लोणार येथील बोकडांना दुबईसह अन्य देशात मागणी.

मयुर गोलेच्छा/ लोणार (जि. बुलडाणा): लोणार येथील बोकडांना दुबईसह अन्य देशात मोठी मागणी होत आहे. लोणार सरोवरामुळे जागतिक पातळीवर ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या नावलौकीकात लोणारच्या बोकडांनी आणखी भर टाकली आहे. डॉ. अनिल तेजराव मापारी यांच्याकडे ५५ एकर शेती आहे. वैद्यकीय व्यवसाय असला तरी शेतीवर लक्ष केंद्रित करुन त्यांनी एक प्रयोगशील शेतकरी अशी ओळख मिळवली आहे. डॉ. मापारी यांनी २00५ मध्ये उस्मानाबादी जातीच्या १८ बकर्‍या व १ बोकड आणून गोटफार्म सुरु करुन शेतीला पुरक व्यवसाय निवडला. राजस्थानमधून शिरोही, चंबल, सोजन जातीच्या व घाटीतून जमनापरी जातीच्या बकर्‍या आणल्या. या बकर्‍यांची योग्य निगा राखल्याने अल्पावधीतच त्यांच्याकडील विविध जातीचे मुब्रा, देवणार आदी बोकड बाजारपेठेत जाऊ लागले. त्यांनी घाटीतून आणलेले जमनापरी शिरोही जातीचे बोकड तर दुबईला पोहचले आहे. या गोटफार्ममधून दरवर्षी ३00 ते ४00 ते नर-मादी तयार होतात. जमनापरी, सोजन, शिरोही जातीच्या बोकडाचे सरासरी वजन १ क्विंटलच्यावर असल्याने त्या बोकडांना १ लाख रुपयांपर्यंत मागणी आहे. या बोकडांच्या आहारात शेंगदाणे, सोयाबीन कुटी, मका कुटीसह काजु बदामाचाही समावेश करून दररोज सकाळ व सायंकाळी १ ते २ लिटर दुध दिले जाते. १ क्विंटलच्यावर वजन असलेल्या व अडीच वर्षे वयाचा ह्यसर्जाह्ण नावाचा जमनापरी बोकड आणि सोजन जातीची बकरी सर्वांचे आकर्षण ठरत आहे. येथे कोकणासह, गोंदीया, नागपूर, हिंगोली, नांदेड, परभणी, औरंगाबाद, लातूर येथील शेतकर्‍यांनी भेटी दिल्या आहेत. शासनाकडून कोणतेही अर्थसहाय्य न घेता विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील हे एकमेव बोकडपालन केंद्र म्हणून ओळखले जाते. डॉ. मापारी युवा शेतकर्‍यांना शेतीसोबतच जोडव्यवसाय करण्यास मार्गदर्शन करत आहेत.