शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown Efect : ट्रॅव्हल्स व्यवसायाला तीन कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 10:45 IST

अकोल्यातील ५० ट्रॅव्हल्स व टॅक्सी संचालकांना जवळपास तीन कोटींचा फटका सोसावा लागत आहे.

- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी शासनाने २१ मार्चपासून राज्यात लॉकडाउन केले. त्यामुळे दळण-वळण पूर्ण ठप्प झाले आहे. याचा फटका ट्रॅव्हल्स व टॅक्सी संचालकांही बसला आहे. अकोल्यातील ५० ट्रॅव्हल्स व टॅक्सी संचालकांना जवळपास तीन कोटींचा फटका सोसावा लागत आहे.कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव राज्यात वाढताच रेल्वे, एसटी आणि टॅÑव्हल्स-टॅक्सींचा चक्काजाम करण्यात आला, त्यामुळे तेव्हापासून रात्रंदिवस रस्त्यावर धावणाऱ्या गाड्या एकाच ठिकाणी थांबल्या आहेत; मात्र गाड्यांवर असणारे चालक-वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांचे वेतन संचालकांना द्यावे लागत आहे. एकाच ठिकाणी उभ्या राहून गाड्यांची बॅटरी उतरू नये, त्या चांगल्या स्थितीत राहाव्यात म्हणून प्रत्येक गाडी थोडा वेळ सुरू करून बंद करावी लागत आहे. अकोल्यात २० ट्रॅव्हल्स आणि ३० टॅक्सी संचालक आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत अकोल्यातील ट्रॅव्हल्स व टॅक्सी संचालकांनी तीन कोटीचा व्यवसाय गमाविला आहे. हा व्यवसाय गमाविला असला तरी दररोजचा लागणारा आरटीओ रोड टॅक्स आणि इन्शूरन्सची रक्कम मात्र या गाडीमालकांना भरावी लागणार आहे. इतरांना जाहीर केलेल्या सवलतीप्रमाणे शासनाने ट्रॅव्हल्स आणि टॅक्सीचालकांना देखील सुट जाहीर करावी.ट्रॅव्हल्स-टॅक्सीची मोठी इन्डस्ट्रीज असून, हजारो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह या उद्योगावर चालतो. अकोल्यातील ट्रॅव्हल्स आणि टॅक्सी युनियनच्या पदाधिकार्यांनी शासनाकडे निवेदन पाठविण्यासाठी बैठक बोलाविली आहे.

लॉकडाउनचा फटका सर्वांनाच बसला आहे; मात्र काही ठराविक लोकांनाच शासनाने सवलती जाहीर केल्यात. शासनाने ट्रॅव्हल्स आणि टॅक्सी संचालकांना तीन महिन्यांसाठी रोड टॅक्स आणि इन्शूरन्समध्ये सुट द्यावी.-ठाकूरदास चौधरी,टॅक्सी संचालक अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या