शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ मंडळात धावणार लोकल!

By admin | Updated: September 30, 2015 23:44 IST

मध्य रेल्वे प्रशासनासमोर प्रस्ताव; लोकलसाठी भुसावळ-नाशिकदरम्यान केली जातेय चाचणी.

राम देशपांडे/ अकोला : मुंबईच्या धर्तीवर भुसावळ मंडळातदेखील लोकल ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी भुसावळ ते नाशिक (नांदगाव) दरम्यान काही चाचण्या घेतल्या जात असून, भुसावळ मंडळाच्या अधिकार्‍यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मध्य रेल्वे मार्गावर भुसावळ मार्गे धावणार्‍या सर्वच एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांना पूर्वीच्या तुलनेत गर्दी वाढली आहे; मात्र प्रवाशांना पुरेशा सुविधा नसल्याने रेल्वेच्या उत्पन्नात अपेक्षित वाढ झाली नाही. या आणि इतर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी, मुंबई उपनगरीय रेल्वेप्रमाणे लोकल ट्रेन चालविण्याचा प्रस्ताव गत काही वर्षांपासून मध्य रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन होता. त्याला रेल्वे प्रशासनाने हिरवी झेंडी दाखवविली असून, या प्रस्तावानुसार भुसावळ ते नाशिक, भुसावळ ते अकोला आणि भुसावळ ते इटारसी या तीन प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यंत क्षणात वेग धरणार्‍या लोकल धावतील. मुंबईच्या धर्तीवर भुसावळ मंडळातही अनेक पायाभूत सुविधांचा अभाव असून, त्यांच्या पूर्ततेकरिता आवश्यक निधी व उपाययोजनांकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. हे काम अधिक वेगाने व्हावे, याकरिता भुसावळ ते नांदगाव-नाशिकदरम्यान अनेक चाचण्या घेण्यात येत असल्याची माहिती भुसावळ मंडळाच्या सुत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी भुसावळ ते नागपूरदरम्यान विशेष मार्ग तयार करण्याची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. वर्धा ते नागपूरदरम्यान हा मार्ग पूर्ण झाला असला तर, उर्वरित मार्गाचे काम अद्याप थंड बस्त्यात आहे. त्यामुळे आहे त्याच मध्य रेल्वे मार्गावर लोकल चालविता येतील की नाही, लोकलची गती किती ठेवावी लागेल, त्याकरिता लागणारी सिग्नल व्यवस्था, थांबे, तसेच इतर एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होता कामा नये, यासाठी स्थानकांवर या एक्स्प्रेस गाड्यांचा थांबण्याचा सुनियोजित कालावधी आदी बाबींवर मध्य रेल्वेची विशेष चमू अभ्यास करीत आहे. या अभ्यासातून येणारे निष्कर्ष आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यासंदर्भात सध्या कोणताही कार्यक्रम हाती नसला तरी, भुसावळ मंडळातील रेल्वे प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याचा आनंद लवकरच उपभोगता येणार असल्याचे संकेत सध्याच्या हालचालींवरून मिळत आहेत. भुसावळ मंडळात लोकल सुरू करण्यासाठी नांदगाव- नाशिकदरम्यान विविध चाचण्या घेण्यात येत असून, या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर लोकल चालविण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अकोला-इटारसी आणि भुसावळ-अकोलादरम्यान लोकल चालविण्यात येईल. यासाठी लागणार्‍या आवश्यक मनुष्यबळाची भरती करण्यात आली असून, त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असल्याचे भुसावळ येथील वरिष्ठ मंडळ अधिकारी विजय नायर यांनी सांगीतले.