शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

विजयाची मदार स्थानिक नेत्यांवरच!

By admin | Updated: October 6, 2014 01:40 IST

अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात मोठय़ा नेत्यांची पाठ: उमेदवारांची दमछाक.

अजय डांगे / अकोला

भाजप-शिवसेना महायुती आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचा स्वतंत्र लढा, युती तुटल्याने चारही पक्षांमध्ये निर्माण झालेली कटूता आणि प्रमुख राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी आतापर्यंंत फिरवलेली पाठ, यामुळे विजयाची मदार तुर्तास तरी स्थानिक नेत्यांवरच अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभेच्या जागा वाटपावरून आघाडी आणि महायुती दुभंगली. त्यामुळे शिवसेना-भाजपचे उमेदवार राज्यभर एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. या चारही पक्षांचे राज्यभरातील नेते ऐकमेकांवर टीका करीत असून, या टीकेचे पडसाद जिल्हास्तरावरही उमटू लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पंचरंगी लढत होणार आहे. प्रचाराला एकच आठवडा शिल्लक असला तरी, तूर्तास जिल्ह्यात एकही पक्ष वातावरणनिर्मिती करू शकलेला नाही. शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक ने त्यांवरच वातावरणनिर्मिती करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्या तरी अकोल्यात सभा होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खासदार, आजी-माजी आमदार आणि इतर नेत्यांचा विजयश्री खेचून आणण्यासाठी कस लागणार आहे. कॉँग्रेसमध्येही अद्याप मोठय़ा सभांच्या दृष्टीने नियोजन झालेले नाही. अशातच कॉँग्रेसमधील नगरसेवक आणि इतर पदाधिकारी विरोधी पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करीत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार हे शुक्रवारी अकोल्यात मुक्कामी थांबले, मात्र त्यांनी सभा घेतली नाही. काही प्रमाणात अशीच स्थिती भारिप-बमसंमध्येही आहे.