शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मृत व्यक्तीला दाखविले जिवंत

By admin | Updated: September 26, 2014 01:49 IST

आरोग्य सुविधेच्या लाभासाठी नाव बदलले.

अकोला : अनेकजण बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय योजनांचा लाभ घेत असल्याच्या घटना बर्‍याचदा घडतात. असाच एक प्रकार सर्वोपचार रुग्णालयात उघडकीस आला. सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ भरती केलेल्या व्यक्तीला मोफत उपचाराचा लाभ मिळावा, यासाठी चक्क दुसर्‍याच्या नावावर भरती केले. मंगरूळपीर तालुक्यातील जामदरा घोटी येथील ४५ वर्षीय व्यक्ती १९ सप्टेंबर रोजी शेतात कीटकनाशक औषध फवारणीसाठी गेला होता; परंतु रात्री त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला कारंजा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानुसार त्या व्यक्तीला २0 स प्टेंबरला सर्वोपचार रुग्णालयात आणले; परंतु रुग्णालयातील खर्चापासून वाचण्यासाठी रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांनी नवीन शक्कल लढविली आणि पिवळे रेशनकार्ड असेल तर मोफत उपचार होऊ शकतो, असे सांगितले आणि एका नातेवाईकाच्या नावाचे पिवळे रेशनकार्ड आणून त्याच्या नावावर त्या रुग्णास भरती केले. चार दिवस उपचार केल्यानंतर २४ सप्टेंबर रोजी त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने, त्याच्या नावाची नोंद करण्याची वेळ आली तेव्हा मृतकाचे कुटुंबीय, नातेवाईक घाबरून गेले. आता काय करावे. मृतकाला तर आपण जवळच्या एका नातेवाईकाच्या नावावर भरती केले. त्याने सर्वच जण मृतकाच्या नावाची नोंद करण्यास टाळाटाळ करू लागले. पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्याने, पोलिसांनी मृतकाचे कुटुंबीय व नातेवाईकांना फटकारत, गावातील सरपंच व पोलिस पाटील यांना सर्वोपचार रुग्णालयात बोलाविण्यास सांगितले. मृतकाच्या मुलाने पोलिसांच्या समक्ष चुकीची कबुली देत, मृतकाचे खरे नाव सांगितले आणि जबाब नोंदविला. गावातील उपसरपंच व पोलिस पाटील यांनी जबाबावर स्वाक्षरी केल्याने प्रकरण मिटले.