शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन अधिका-यांना मुख्यालयाची ‘अँलर्जी’

By admin | Updated: April 1, 2017 03:05 IST

अकोला जिल्ह्यातील सात केंद्रे आढळली बंद, बाळापुरात खासगी व्यक्ती करते उपचार.

अकोला, दि. ३१- पशुधनावर भिस्त असलेल्या शेतकर्‍यांचे पशुधनच पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे वार्‍यावर सोडल्याचे चित्र ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये जिल्हय़ात सर्वदूर दिसून आले. विशेष म्हणजे, कायद्याने पशुधन विकास अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाशिवाय पर्यवेक्षकांनी वैद्यकीय उपचार करण्यास बंदी आहे. त्याचवेळी पशुधन विकास अधिकारी मुख्यालयी उपस्थितच राहत नसल्याने पर्यवेक्षकांनाच जनावरांवर वैद्यकीय उपचाराची सक्ती करण्याचा विरोधाभासही दिसून आला. एकीकडे कायद्याच्या बडग्याने पर्यवेक्षकांना कमी लेखायचे, तर दुसरीकडे दबावातून त्यांच्याकडूनच उपचार करून घेण्याचा उद्दामपणाही जिल्हय़ात सुरू आहे. त्यातही पशुधन विकास अधिकारी मुख्यालयी न राहताच चार ते सहा हजार रुपये घरभाडे भत्त्यापोटी लाटत असल्याचेही पुढे आले आहे. पशुधन विकास अधिकारी संवर्गातीलच सर्व वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांची दादागिरी सर्वत्र खपवून घेतली जात आहे. त्यांना आवर न घातल्यास जिल्हय़ातील पशुधनाला फटका सातत्याने बसतच राहील, अशी भीतीही व्यक्त होत आहे. बाळापुरातील लघू पशु चिकित्सालयात खासगी व्यक्ती उपचार करीत असल्याचा प्रकार समोर आला.जिल्हय़ातील पशु चिकित्सालयात सुरू असलेला सावळा गोंधळ उघड करण्यासाठी लोकमतने जिल्हाभरातील २५ पशु चिकित्सालयात २९ मार्च रोजी एकाच वेळी स्टिंग राबवले. या स्टिंगमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. बाळापूर येथील लघू पशु चिकित्सालयात खासगी व्यक्ती गुरांवर उपचार करीत असल्याचे आढळले. दुर्गवाडा येथे पशुधन अधिकार्‍यांचे पद रिक्त असल्याने पर्यवेक्षक व परिचरच रुग्णांवर उपचार करीत असल्याचे समोर आले. बाश्रीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप येथे भेट दिली असता, पशुधन अधिकारी सराळा येथे गेल्याची माहिती मिळाली. वास्तविक पाहता सराळा हे गाव कान्हेरी सरपंच्या कार्यक्षेत्रातच येत नाही. तेल्हारा तालुक्यातील अडगाव बु.येथील पशु चिकित्सालयात औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. पशुपालकांना खासगी औषध दुकानांमधून औषध विकत आणावे लागते. या स्टिंगदरम्यान ११ पशु चिकित्सालयात पशुधन अधिकारी उपस्थित असल्याचे तसेच स्वत: उपचार करीत असल्याचे आढळले. हे पशुधन अधिकारी करतात अप-डाउन सस्ती, वाडेगाव, उगवा, कुरूम, कान्हेरी सरप, पारस, अडगाव बु., बोरगावमंजू आणि महान. ही पशु चिकित्सालये आढळली बंद महान, वरखेड देवदरी, पिंपळखुटा, भटोरी, अंदुरा, उमरा, कान्हेरी सरप. हे पशुधन अधिकारी होते उपस्थित आलेगाव, हिवरखेड, उगवा, जामठी बु., मुंडगाव, पारस, धाबा, तेल्हारा, दानापूर, बोरगावमंजू आणि अडगाव बु.