शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य प्रेरणेतूनच चित्रपटक्षेत्रात वाटचाल- राजदत्त

By admin | Updated: February 15, 2016 02:18 IST

सतीश देशमुख यांच्या ‘प्रत्यय’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व सत्कार सोहळा.

अकोला: साहित्य माणसाला प्रेरणा देत असतं. माझ्या चित्रपटसृष्टीतील वाटचालीला साहित्यातूनच बळ मिळाल्याने या क्षेत्रात चांगले काम करू शकलो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक तथा संस्कार भारतीचे अध्यक्ष राजदत्त यांनी रविवारी येथे केले.प्रमिलाताई ओक नाट्यगृहात दामोदर उपाख्य नानासहेब देशमुख ट्रस्ट श्री भवानी आयोजित काव्यसंग्रह प्रकाशन व सस्कार सोहळ्य़ाच्या अध्यक्षस्थानाहून राजदत्त बोलत होते. कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ, समीक्षक डॉ. अशोक पळवेकर, महापौर उज्ज्वला देशमुख व सतीश देशमुख वेणीकोठीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राजदत्त म्हणाले, कवी सभोवालचा अनुभव त्याच्या आशयघन शब्दांतून व्यक्त करीत असतो. प्रत्येकाची अभिव्यक्ती ही सारखी असू शकत नाही. त्यामुळे त्यांना मुक्तपणे व्यक्त होऊ द्यावं. कवीच्या मनातील भावविश्‍व जेव्हा वाचकांना भावतं, तेच कवीचं यश असते. वेणीकोठीकरांच्या कविता तशाच समृद्ध, आशयघन होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. डॉ. वाघ यांनी वेणीकोठीकरांच्या कविता दगडाला पाझर फोडणार्‍या असून, व्यक्तीकडून समष्टीकडे जाणार्‍या असल्याचे समीक्षण आपल्या शैलीत केले. कविता अर्थवाही असावी, तर प्रतिभा ही प्रतिकांतून व्यक्त झाली पाहिजे, असे मार्मीक संबोधनही त्यांनी केले. महापौर देशमुख यांनी वेणीकोठीकरांच्या कविता वास्तववादी असल्याचे सांग ताना, त्या माणसं जोडणार्‍या असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. पळवेकरांनी यावेळी त्यांच्या कवितेवर सुंदर विवेचन केले. वेणीकोठीकरांनी प्रास्ताविकातून त्यांची भूमिका मांडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सतीश देशमुख वेणीकोठीकर यांचा ह्यप्रत्ययह्ण हा काव्यसंग्रह तसेच 'मुक्तछंद' अनियतकालकाचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी करणार्‍या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सनत आहाळे यांचा शाल-श्रीफळ व काव्यसंग्रह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. शेतकर्‍यांच्या न्यायासाठी काम करणारे प्रवीण देशमुख, 'रजधूळ'च्या माध्यमातून लोक-साहित्य प्रबोधन करणार्‍या देवकाबाई देशमुख, कवी-साहित्यिक सुरेश पाचकवडे यांचा सत्कारमूर्तींंमध्ये समावेश होता. सतीश देशमुख वेणीकोठीकर यांचा राजदत्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.