शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलने संस्काराची दालने व्हावीत

By admin | Updated: December 13, 2014 00:07 IST

हरिभाऊ वेरूळकर यांचे प्रतिपादन :अकोला येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाला थाटात प्रारंभ.

अकोला : आज सुसंस्कारांची कमतरता सर्वच क्षेत्रात जाणवत आहे. ज्या शिक्षण क्षेत्रातून संस्काराची अपेक्षा केली जाते, त्यानेदेखील संस्काराची नाळ तोडली आहे. अशा परिस्थितीत साहित्य संमेलनांमधून संस्काराचा विचार प्रतिपादीत होणे गरजेचे आहे; कारण साहित्य संमेलन हा एक लोकोत्सव आहे, यातून विचारांचे सिंचन होते. संस्काराची जबाबदारी आता साहित्यिकांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. सर्वच साहित्य संमेलने ही संस्काराची दालने झाली पाहिजेत, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी शुक्रवारी अकोल्यात व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने आयोजित दुसर्‍या राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आचार्य वेरुळकर बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन अमरावती येथील प्राचार्य डॉ. पी.आर. राजपूत यांच्या हस्ते झाले. मंचावर शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. गजानन नारे, महापौर उज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, गुरुदेव सेवा मंडळाचे उप सर्वाधिकारी रुपराव वाघ, ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मण नारखेडे, भाई प्रदीप देशमुख, डॉ. पुरुषोत्तम तायडे, अँड. रामसिंग राजपूत, आमले महाराज, डॉ. ज्ञानेश्‍वर मिरगे, सुधाताई जवंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रसंताचे विचार म्हणजे सर्व संतांचे विचार, त्यामुळे हे संमेलन सर्व संतांच्या विचारांचे संमेलन असल्याचे वेरुळकर यांनी यावेळी सांगितले. आजची समाज व्यवस्था सुधारावी, असे वाटत असेल, तर राष्ट्रसंतांच्या विचारांशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले. साहित्य संमेलन चौकटबद्ध करु नका. सर्वांना यात सामावून घ्या; कारण राष्ट्रसंतांना सर्वसमावेशक विचार प्रिय होते, असे डॉ. राजपूत यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले. यावेळी रुपराव वाघ, प्रा. संजय खडसे, महापौर उज्वला देशमुख व उपमहापौर विनोद मापारी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी केले. संचालन रामेश्‍वर बरगट यांनी, तर आभार प्रा. अभिजीत गहूकर यांनी मानले. दुपारच्या सत्रात दोन परिसंवाद व राष्ट्रसंतांच्या भजनांचे सादरीकरण झाले. रविवारी या तीन दिवसीय संमेलनाचा समारोप होणार आहे.