शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाच्या दोन बायका अन फजिती ऐका!

By admin | Updated: August 29, 2016 01:34 IST

पोलिसाच्या पहिल्या पत्नीने दिला प्रेयसीला चोप.

अकोला दि. २८ : रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) कार्यरत एका पोलीस कर्मचार्‍याचे पत्नी असताना दुसर्‍या एका महिलेशी अनैतिक संबध असल्याच्या संशयावरू न आरपीएफच्या पत्नीने त्या महिलेचा शोध घेऊन रविवारी दुपारी तिला सातव चौकामध्ये चांगलेच झोडपले. पतीला माहित न होऊ देता आरपीएफच्या पत्नीने पतीच्या या प्रेयसीचा शोध घेतला. हा प्रकार पाहण्यासाठी सातव चौकात चांगलीच गर्दी झाली होती. दरम्यान ती प्रेयसी आरपीएफची दुसरी पत्नी असल्याची चर्चा होती.आरपीएफमधील पोलीस कर्मचारी पत्नी् मुलांसह न्यू तापडियानगरमधील एका भाड्याच्या घरात राहतात. मात्र पतीला शेगाव येथे आणखी एक प्रेयसी असल्याचा संशय पत्नीला आला. पतीच्या वागणुकीवरून तिचा संशय वाढत गेला. तिने पतीच्या प्रेयसीबाबत बाहेर चौकशी सुरू केली, मात्र या संदर्भात पतीला सुगावा लागू दिला नाही. पतीला दुसरी प्रेयसी असल्याची माहिती पक्की झाल्यानंतर पहिल्या पत्नीने पतीवर पाळत ठेवली. रविवारी दुपारी शेगाव येथील पोलीस कर्मचार्‍याची प्रेयसी त्याला भेटण्यासाठी सातव चौक परिसरात आल्याची माहिती पहिल्या पत्नीला मिळाली. तिने तातडीने सातव चौक परिसरात धाव घेऊन पतीच्या पेयसीला चांगलेच झोडपले. आरपीएफची दुसरी पत्नीच असल्याची चर्चा असल्याने ह्यदोन बायका फजिती ऐकाह्ण चा प्रकार सातव चौकात लोकांना बघायला मिळाला. पोलीस पतीलाही पहिल्या पत्नीने शिव्यांची लाखोली वाहिली. हा वाद भर रस्त्यावर सुरू असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. दोन महिलांमधील हाणामारी बघण्याची संधी अनेकांनी साधली. महिलांची मारामारी सुरू असल्याची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरली. दुपारी ३ वाजताच्या सुमारास सुरू झालेला हा प्रकार तब्बल एक ते दीड तास सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही महिलांना ताब्यात घेतले.पोलिसांच्या दोन बायकांची चर्चागत महिन्यातच बाळापूर नाक्यावर एका परिचारिकेने तिच्या पतीसह पोलीस कर्मचारी असलेल्या प्रेयसीला चांगलेच चोपले होते. या ठिकाणी पोलिसाच्या बायको व प्रेयसीचे भांडण पाहण्यासाठी गर्दी झाल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर रविवारी सातव चौक परिसरात आणखी एका पोलीस कर्मचार्‍याच्या दोन बायकांवरून वाद झाले. या ठिकाणीही पोलिसांच्या दोन बायकांवरून चांगलीच चर्चा रंगली. बहुतांश पोलीस पत्नीसह एक प्रेयसी वागवीत असल्याची चर्चा सातव चौकात रंगली होती.