लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मूर्तिजापूर शहरातील हॉटेल वैशाली येथून तब्बल १ लाख रुपयांची दारू व मुद्देमाल त्यानंतर खडकी येथील एका इसमाकडून दुचाकीसह ५५ हजारांचा मुद्देमाल तर आणखी एका कारवाईत दोन युवकांकडून ४६ हजारांचा मुद्देमाल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी केला. तीन ठिकाणी छापेमारी करीत ही कारवाई करण्यात आली असून, तब्बल दोन लाख रुपयांच्यावर मुद्देमाल विशेष पथकाने सोमवारी हस्तगत केला आहे.मूर्तिजापुरातील शुभम महाजन आणि सागर महाजन यांच्या मालकीच्या हॉटेल वैशाली येथे छापा टाकून विशेष पथकाने देशी व विदेशी दारूसह तब्बल १ लाख एक हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या ठिकाणावरून हॉटेलचा मालक सागर महाजन याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध मूर्तिजापर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यानंतर खडकी येथील सचिन श्रीराम ठाकरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील २ हजार २८० रुपयांच्या दारूसह तब्बल ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईआधी गोरक्षण रोडवर रमेश ओंकार भिंलगे (भीम नगर), आशीष धनाकुमार गडेकर (डाबकी रोड) हे दोघे देशी दारू घेऊन असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडून ६ हजारांची देशी दारू, एमएच ३० एजे ६६२२ क्रमाकांची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. तीनही ठिकाणच्या आरोपींवर त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळासपुरे यांनी केली आहे.
मूर्तिजापुरातील हॉटेलमधून दारू जप्त
By admin | Updated: July 11, 2017 01:05 IST