अकोला : येत्या ७२ तासांत मराठवाडा वगळता विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. विदर्भात पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकर्यांनी उर्वरित क्षेत्रावर पेरणी केली आहे. परंतु गत आठवड्यापासून पुन्हा पावसाने पाठ फिरवल्याने पिके कोमेजू लागली आहेत. येत्या ७२ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिल्याने शेतकर्यांचे डोळे नभाकडे लागले आहेत. * पश्चिम विदर्भात कमी पाऊस पश्चिम विदर्भात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने मुख्यत्वे अकोला, बुलडाणा जिल्हय़ातील परिस्थिती चिंताजनक आहे. या जिल्हय़ातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारे धरणं, तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा!
By admin | Updated: August 3, 2015 00:33 IST