शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘हे जीवन एक लढाई, कधी हिंमत हारायची नाही!’

By admin | Updated: February 17, 2016 02:33 IST

ग्रंथोत्सवातील कविसंमेलनात उमटली शेतक-यांची व्यथा.

अकोला: शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवात मंगळवारी दुपारी ३ वाजता कविसंमेलन पार पडले. वैदर्भीय शेतकर्‍यांचे दु:ख म्हणजे एक लढाई असून, ती जिंकण्यासाठी हिंमत न हारण्याचे आवाहन करणारी कविता किशोर बळी यांनी सादर करून वैदर्भीय शेतकर्‍यांची सद्यस्थिती मांडली. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाचकवडे होते. व्यासपीठावर उपस्थित अरविंद भोंडे, राजेश दांगटे, सुरेश पाचकवडे, रवींद्र महल्ले व पोहेकर यांनी आपल्या विविध रचना सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांना भारावून सोडले. यावेळी राजेश दांगटे यांनी ह्यशांताबाईह्ण व ह्यपुस्तकांचे झाडह्ण या दोन काव्यरचना सादर केल्या, तर ग्रंथालयाचे कर्मचारी पोहेकर यांनी ह्यग्रंथालयात तुम्ही बसून पाहा, पुस्तकाच्या सान्निध्यात जगून पाहा.ह्ण व ह्यहुंडाह्ण या ज्वलंत विषयावर कविता सादर केल्या. अरविंद भोंडे यांनी अनेक विनोदी किस्से सांगून उपस्थितांना खळाळून हसविले तसेच ह्यराम-रहीम एक आहे, सारे जण म्हणतात..ह्ण ही देशभक्तीचा संदेश देणारी रचना सादर केली. रवींद्र म्हल्ले यांनी ग्रामीण भागातील सत्यस्थितीचे वर्णन करणारी वर्‍हाडी कविता सादर करून रसिकांना हेलावून सोडले. सुरेश पाचकवडे यांनी ह्यदहशतह्ण आणि ह्यदगडह्ण या दोन काव्यरचना सादर केल्या. बहारदार सूत्रसंचालन करताना बळी यांनी ह्यकसं सांगू तुले सावित्रीबाई फुले..ह्ण ही कविता सादर करून, विसंगती, अतिशयोक्ती व अपेक्षाभंगातून कसे विनोदी किस्से घडतात, हे सांगत अनेक किश्श्यांद्वारे रसिक श्रोत्यांना खळखळून हसविले. कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.