शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘लक्ष्मी’च्या आयुष्याला मिळाला आधार!

By admin | Updated: April 14, 2016 01:36 IST

गुलाबराव गावंडेंनी घेतले दत्तक, कन्यादानासह लग्नाचा खर्च उचलणार!

सचिन राऊत /अकोलालग्नाच्या चार दिवसाआधी पित्याचे छत्र हरपलेल्या धारेल येथील लक्ष्मीह्णच्या आयुष्याला माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी आधार दिला. तिच्या कन्यादानाची जबाबदारी उचलत गावंडे यांनी लग्नाचा संपूर्ण खर्च करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लहान मुलगी उज्ज्वला हिच्या शिक्षणासह इतर खर्चही ते करणार आहेत. लोकमतने बुधवारच्या अंकात या कुटुंबाची व्यथा मांडली होती.धारेल येथील शेषराव शहादेव ठोसरे यांची मोठी मुलगी लक्ष्मीचे लग्न १६ एप्रिल रोजी होत आहे. लग्नाचा खर्च पाहून खचलेल्या लक्ष्मीच्या वडिलांनी शनिवारी रात्री जाळून घेतले होते. लक्ष्मीचे लग्न चार दिवसांवर असताना तिच्या वडिलांनी अखेरचा श्‍वास घेतला. मुलीच्या लग्नाचे बापाने बघितलेले स्वप्न तो गेल्यानंतर पूर्ण होईल की नाही, ही चिंता कुटुंबियांना होती; मात्र लोकमतने लक्ष्मीची हृदयद्रावक व्यथा समाजासमोर मांडल्यानंतर समाजातील सहृदयी व्यक्ती तिच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी बाबाचे छत्र हरविलेल्या लक्ष्मीला दत्तक घेत, तिच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. १६ एप्रिल रोजी गुलाबराव गावंडे कुटुंबीयांसह धारेल येथे उपस्थिती लावून लक्ष्मीचे कन्यादान करणार आहेत. लक्ष्मीच्या लग्नानंतर लहान मुलगी उज्ज्वला हिचा शैक्षणिक खर्चही आपण करून, असे गावंडे यांनी सांगितले. गुलाबराव गावंडे यांच्या रूपाने पितृतुल्य आधार मिळाल्याची भावना ठोसरे कुटुंबियांनी व्यक्त केली. उघड्यावर आलेला संसार आणि मुलीच्या शिक्षणाला लोकमतमुळे आधार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.लोकमतच आमचे माय-बाप ना शासनाच्या योजनेची माहिती, ना आम्हाला कोणी ओळखणारे, त्यामुळे आमचा आधार पूर्णत: तुटला होता. घरचा कर्ता माणूस गेल्याने आता संसाराचा गाडा ओढावा तरी कसा, हा प्रश्न पडला होता. मुला-बाळांसह आपणही आयुष्याचे बरे-वाईट करावे, असे विचार मनात घर करत असताना अचानक ह्यलोकमतह्ण माय-बाप म्हणून समोर आल्याच्या भावना लक्ष्मी व उज्ज्वलाच्या आईने व्यक्त केल्या.