शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीस आजीवन कारावास; जिल्हा व सत्र न्यायालयाने ठाेठावली शिक्षा

By आशीष गावंडे | Updated: August 8, 2024 20:11 IST

आरोपी माेहन हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नेहमी भांडण करायचा.

आशिष गावंडे/ अकोला: घरामध्ये स्वयंपाक करीत असलेल्या पत्नीसाेबत वाद घालून तीच्या अंगावर घासलेट टाकून तीला जीवंत जाळणाऱ्या संशयीवृत्तीच्या पतीला आजीवन कारावासाची शिक्षा ठाेठावण्यात आली. गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक -२ श्रीमती एस.सी. जाधव यांनी शिक्षा सुनावली. 

मोहन विक्रम डोंगरे (वय ५५ रा. इंदिरा नगर झोपडपट्टी, वाडेगाव ता. बाळापूर, जि. अकोला) असे शिक्षा ठाेठावण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे.  आरोपी माेहन हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नेहमी भांडण करायचा. २९ मे २०१४ रोजी आरोपीने त्याची पत्नी स्वयंपाक करीत असतांना, तिच्यासोबत वाद घातला व त्यानंतर पत्नीच्या अंगावर घासलेट टाकून तिला पेटवून दिले. ही बाब मुलाच्या लक्षात येताच त्याने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जखमी आइला रुग्णालयात भरती केले. त्यावेळी गंभीररित्या भाजलेल्या महिलेने तहसिलदारांना मृत्युपूर्व बयान दिले हाेते. त्या बयानवरुन आराेपी माेहन डाेंगरे याच्या विराेधात बाळापूर पोलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणाचा तपास सहायक पाेलिस निरीक्षक जी.एम. गुरुकर यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्यासाठी फिर्यादीसह एकुण ११ साक्षीदार तपासले. तसेच बचाव पक्षानेही आराेपीच्या दुस-या मुलासह इतर एका साक्षीदारास तपासले. जिल्हा व सत्र न्यायालयाने सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय मानुन आरोपीस कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील आशिष फुंडकर यांनी बाजू मांडली. तसेच हेड कॉन्स्टेबल रेखा हातोलकर व सीएमएस सेलचे संतोष उंबरकर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Akolaअकोला