शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडीने घातले घाव; न्यायालयाने ठाेठावली जन्मठेप, बाळापूर तालुक्यातील घटना

By आशीष गावंडे | Updated: April 8, 2024 21:40 IST

कलम ५०६ अंतर्गत २ वर्षाचा कारावास ठाेठावला.

अकाेला: जुन्या वादातून कु-हाडीने घाव घालून रामकिशोर सुरजप्रसाद राजपुत यांची हत्या करणारा आराेपी राहुल उर्फ गेंडा मोहन गवारगुरु याला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती शयना पाटील यांनी भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच कलम ५०६ अंतर्गत २ वर्षाचा कारावास ठाेठावला.

सुमारे चार वर्षांपूर्वी ९ नाेव्हेंबर २०२० रोजी राहुल उर्फ गेंडा मोहन गवारगुरु रा.काेळासा, ता.मुर्तिजापूर जि.अकाेला याने जुन्या वादातून रामकिशोर सुरजप्रसाद राजपुत यांच्यावर प्रकाश वानखडे व गव्हांदे यांच्या घराजवळ कु-हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले हाेते. स्थानिक नागरिकांनी अडवले असता, त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देत आराेपी राहुल गवारगुरू निघून गेला. याप्रकरणी मृतकाची सासू , मुलीने जखमी अवस्थेतील रामकिशाेर यांना बाळापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता,डॉक्टरांनी त्यांला मृत घोषीत केले. यामुळे मृतकाची सासु तायराबी उर्फ ताराबाई तुराबशहा यांच्या फिर्यादीवरुन बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुध्द भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपी राहुल उर्फ गेंडा मोहन गवारगुरु व आरोपी राष्ट्रपाल उर्फ जग्गु सुखदेव सिरसाठ यांनी कट रचुन मृतकाला ठार केले. यामुळे कलम ३०२, ५०६, १२०-ब, ३४ नुसार गुन्हा दाखल केला हाेता. गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक नितीन शिंदे यांनी करुन न्यायालयाल दोषारोपपत्र दाखल केले हाेते. 

साक्ष ठरली महत्वाचीया प्रकरणी सरकार पक्षाने एकूण सात साक्षीदार तपासले. मृतकाची सासु व फिर्यादी तसेच इतर तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सरकारी पंच, डॉक्टर व तपासी अधिकाऱ्यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकार पक्षाचे पुरावे ग्राहय मानुन दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी राहुल गवारगुरु याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दुसरा आराेपी राष्ट्रपाल उर्फ जग्गु सुखदेव सिरसाठ यास सबळ पुराव्याअभावी सोडुन देण्यात आले. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील आनंद गोदे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. बाळापूरचे पाेलिस स्टेशनचे कोर्ट पैरवी रेखा हातोलकर, एच.सी. संतोष उंबरकार यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Akolaअकोला