शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय प्रशिक्षणार्थींना जीवन गट विम्याचे कवच!

By admin | Updated: June 29, 2017 01:32 IST

गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांचा पाठपुरावा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योजना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व शासकीय तांत्रिक विद्यालयांमधील प्रवेशीत प्रशिक्षणार्थींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यंदा शैक्षणिक वर्षापासून जीवन गट विमा योजना शासनाने लागू केली आहे. यासाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ही योजना लागू करून घेतली. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेताना अनेकदा जोखमीचे व धोकादायक यंत्र हाताळावे लागतात. हे यंत्र हाताळताना अनेकदा अपघात घडून विद्यार्थ्यांवर मृत्यूचासुद्धा प्रसंग ओढावतो. त्यामुळे आयटीआय व तांत्रिक विद्यालयात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जीवन गट विम्याच्या माध्यमातून सुरक्षा कवच लाभावे, यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन ही योजना अमलात यावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. बुधवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कौशल्य विकास विभागाच्या विविध घटकांचा आढावा घेतला. या बैठकीला कौशल्य विकास विभागाचे संचालक व मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.बैठकीत डॉ. पाटील यांनी महाजन समिती अहवाल तसेच गेडाम समिती अहवालांची सद्यस्थिती, समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली कार्यवाही आणि विलंबाची कारणे, सेंटर आॅफ एक्सलन्स (सीओई) अंतर्गत अ‍ॅडव्हान्स मॉड्युलरचे सीटीएसमध्ये रूपांतर करण्याबाबत आणि या योजनेतील मंजूर पदांचे समायोजन याबाबत सद्यस्थिती, तासिका तत्त्वावरील निदेशकांचे मानधन वाढविणे, गट-अ ते गट-क पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरणे याचीही माहिती डॉ. रणजित पाटील यांनी जाणून घेतली. द्विस्तरीय अभ्यासक्रम बदलण्याची गरज!द्विस्तरीय अभ्यासक्रम प्रक्रिया संपूर्ण बदलण्याची गरज असून, राज्यातील कमी मागणीचे अभ्यासक्रम असलेल्या ५३२ तुकड्या या जास्त मागणीच्या अभ्यासक्रमासाठी वर्ग करणे, यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही डॉ. पाटील यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.