शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला हमीभाव मिळावा!

By admin | Updated: October 1, 2015 00:06 IST

लोकमत परिचर्चेत सूर; सिंचन, पुरेसा वीजपुरवठा व पीक कर्ज वेळेवर मिळण्याची अपेक्षा.

बुलडाणा : मागील चार वर्षांंंपासून दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी उत्पादनात घट येणार असल्यामुळे आर्थिक फटका बसणार आहे. त्यातच शेतमालास निर्यातबंदी असून, तूर, कांदा आदी पिकांची आयात करण्यात येत आहे. त्याचा फटका देशातील शेतकर्‍यांना बसत आहे. शासनाने शेतमालाची निर्यातबंदी उठवावी व उत्पादित मालाला हमी भाव द्यावा, तरच निसर्गामुळे कोलमडलेला शेतकरी हिंमतीने उभा राहू शकतो, असा सूर लोकमतने ३0 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या परिचर्चेत सहभागी शेतकर्‍यांनी काढला. जिल्ह्यात मागील चार वर्षापासून विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी जेरीस आले आहेत. प्रतिकूल हवामान, पावसाच्या अनियमिततेमुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खरीप हंगाम दगा देऊन गेला. यामुळे आर्थिक तथा मानसिकदृष्ट्या खचलेल्या काही शेतकर्‍यांनी आत्महत्येसारखा दुर्दैवी निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान, काही सेवाभावी संस्थांनी विविध माध्यमातून शेतकर्‍यांना मदत केली; मात्र शेतकर्‍यांना जगवायचे असेल, तर शासनाने ठोस उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. अन्नधान्य पिकविणारा शेतकरी जगला, तरच देश जगेल, हा मूलमंत्र लक्षात घेऊन शासनाने उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा शेतकर्‍यांनी यावेळी व्यक्त केली. या परिचर्चेत समाधान पाटील,विष्णू पाटील कुळसुंदर, सुरेश पाटील, डॉ. बाबूराव नरोटे, देविदास कणखर इत्यादी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.