शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

चतारी परिसरात बिबट्याचा वावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:35 IST

खेट्री : पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ग्राम चतारी येथे बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ...

खेट्री : पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ग्राम चतारी येथे बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

चतारी येथील रुग्णालय परिसरातील शासकीय क्वॉर्टरमधील रहिवासी लखन बनसोड यास ११ डिसेंबरच्या रात्री बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्याने लखन बनसोड यांना पाहताच त्यांच्यावर झेप घेण्याचा प्रयत्न केला; मात्र समयसूचकता दाखवून लखन बनसोड यांनी घरात प्रवेश केला व दरवाजा बंद केला. याबाबत त्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालया‌चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. माहोरे यांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली. दरम्यान, डॉ. माहोरे यांनी संबंधित घटनेबाबत पोलीसपाटील विजय सरदार यांना सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसपाटील विजय सरदार व सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेत बनसोड यांची विचारपूस केली. त्यानंतर आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे यांना माहिती देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी नालिंदे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक लखन खोकड व वनविभागाचे अन्य कर्मचारी पोलीसपाटील तसेच वन्यजीवप्रेमी, अमर लखाडे, गणेश उमाळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु आढळून आला नाही. याबाबत गावात माहिती पसरताच शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने लक्ष देऊन तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

----------------

या परिसरात काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्यामुळे तसेच पिंपळखुटा परिसरात दोन बिबटे आढळल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाला सूचना द्यावी. शोधमोहीम सुरू आहे.

- सतीश नालिंदे,

वनपरिक्षेत्र अधिकारी, आलेगाव