शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी टीव्ही खरेदीच्या नावाखाली ठगविले!

By admin | Updated: October 25, 2016 03:01 IST

३६ हजार रुपये रोख व सोन्याची अंगठी अज्ञात ठगाने केली लंपास.

अकोला, दि. २४- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चार एलईडी टीव्ही खरेदी करण्याचे आमिष दाखवून येथील निशांत सेल्सच्या एका सेल्समनकडील ३६ हजार रुपये रोख व सोन्याची अंगठी अज्ञात ठगाने लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघड झाली. निशांत सेल्स येथील सेल्समन किरण प्रतापराव अंधारे यांच्याकडे सोमवारी दुपारी नदीम नामक व्यक्ती गेला. त्यानंतर नदीमने अंधारे यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चार एलईडी लावायचे असून ते निशांत सेल्स येथूनच खरेदी करणार असल्याचे सांगितले; मात्र त्यासाठी अंधारे यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावे लागणार असल्याचे सांगितले. सदर इसमाने अंधारे यांना विश्‍वासात घेतल्याने अंधारेही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले. त्यानंतर नदीम नामक व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कक्षाच्या आतमध्ये जाऊन काही वेळात परत आला. त्याने अंधारे यांना एक हजार रुपयांच्या नोटा असलेले एक लाख रुपये देणार असल्याचे सांगितले; मात्र एलईडी टीव्ही ८४ हजार रुपयांच्या होणार असल्याने अंधारे यांना १६ हजार परत मागितले अंधारे यांनी त्याला १६ हजार दिले त्यानंतर आणखी २0 हजार रुपये दिले. एवढेच नव्हे तर हाताच्या बोटातील सोन्याची अंगठीही या ठगाने काढून घेतली. अंधारे यांनी त्याला रोख ३६ हजार आणि ७ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली व तो ज्या कक्षात गेला त्या कक्षाच्या बाहेर बसले. बराच वेळ झाला तरी या ठगबाज परत न आल्याने त्यांनी कक्षात जाऊन चौकशी केली असता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असा एकही व्यक्ती नसल्याचे त्यांना कळले. त्यानंतर अंधारे यांना फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी या प्रकरणाची तक्रार केली. सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.