शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

परवाना विभाग प्रमुखाची उचलबांगडी

By admin | Updated: May 25, 2017 01:33 IST

मनपा आयुक्तांचे निर्देश; शिक्षण विभागात होणार बदली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात व्यवसाय करणाऱ्यांच्या परवान्याचे परस्पर नूतनीकरण न करण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या परवाना विभागाचे प्रमुख राजेंद्र गोतमारे यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला आहे. गोतमारे यांची शिक्षण विभागात बदली करण्याचे निर्देश आयुक्तांनी जारी केले आहेत. शहरात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठी महापालिकेचा परवाना घ्यावा लागतो. या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. नूतनीकरणाच्या बदल्यात मनपाला शुल्क जमा करावे लागतात. नूतनीकरणाचा प्रस्ताव परवाना विभागामार्फत उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्याकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे. या ठिकाणी तसे न करता परवाना विभागाच्या स्तरावर परस्पर ही प्रक्रिया राबवली जात असल्याची बाब उपायुक्त समाधान सोळंके यांच्या निदर्शनास आली होती. यासंदर्भात त्यांनी परवाना विभाग प्रमुख राजेंद्र गोतमारे यांना नूतनीकरणाचे प्रस्ताव उपायुक्त किंवा सहायक आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. साहजिकच, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन होणे अपेक्षित असताना मार्च महिन्याच्या कालावधीत शहरातील असंख्य व्यावसायिकांच्या परवान्याचे विभाग प्रमुख गोतमारे यांनी परस्पर नूतनीकरण केल्याची बाब समोर आली. या प्रकरणाची दखल घेत ही बाब उपायुक्तांनी आयुक्त अजय लहाने यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विभाग प्रमुख गोतमारे यांना निलंबित करण्याचे निर्देश आयुक्तांनी जारी केले होते. निलंबन केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना अर्धे वेतन द्यावे लागत असल्यामुळे गोतमारे यांचे निलंबन न करता त्यांची शिक्षण विभागात बदली करण्यासह त्यांचे दोन महिन्यांचे वेतन कपात करण्याचे निर्देश आयुक्तांनी जारी केले आहेत. विभागाला दलालांचा विळखाशहरातील ज्या व्यावसायिकांना मनपाने परवान्यांचे वाटप केले, अशा परवान्याची मुदत कधी संपते, त्याची इत्थंभूत माहिती परवाना विभागात जमा आहे. संबंधित व्यावसायिकांची भेट घेऊन परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी या विभागात चार दलाल सक्रिय आहेत. नूतनीकरणासाठी प्रत्येक व्यावसायिकाकडून दोन हजार रुपये घेतल्यानंतर सेतू संचालकाला ५०० रुपये आणि उर्वरित दीड हजारात इतर सर्वजण अशी ही ‘शाळा’ सुरू असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.