शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ात कायदा व सुव्यवस्था ढासळली

By admin | Updated: July 3, 2014 01:40 IST

खंडणीबहाद्दर, चोरटे, लुटारु, गावगुंडांचे वाढते प्रस्थ

अकोला: जिल्हय़ासह शहरामध्ये गल्लीबोळातील गुंडांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दररोज घरफोड्या, चोर्‍या, हाणामारी, लुटमारीच्या घटना घडत आहेत. पोलिस केवळ गुन्हा दाखल करण्यापुरतेच उरले आहेत. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे गुंड, चोरट्यांचे मनोबल वाढले. दररोजच्या घडणार्‍या गंभीर गुन्हय़ांमुळे जिल्हय़ात कायदा व सुव्यवस्था केवळ नावालाच असल्याचा आरोप आता नागरिकांकडून होऊ लागला आहे. जिल्हय़ातील बाळापूर तालुक्यातील काही गावांमध्ये चोरट्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. गावातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. पोलिसांचे काम नागरिकांना करावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली. चोरी, घरफोडी झाली की, पोलिस घटनास्थळावर पोहोचून पंचनामा करतात. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करतात. गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरणाचा तपास सहा महिनेच काय वर्षभरानंतरही सुरू असतो. तक्रारकर्ता पोलिस ठाण्याच्या चकरा मारून थकून जातो; परंतु त्याला न्याय मिळत नाही. त्याचा चोरीस गेलेला माल परत नाही. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्‍वास कमी होत आहे. चोरी, घरफोडी, फसवणूक झाली, खंडणी मागितली तरी पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला जात नाही. एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही वर्षांपासून मुली, महिलांना पळवून नेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गुंडगिरीचे प्रमाण एवढे प्रचंड वाढले आहे की, गुंडगिरीला आवर कसा घालावा, याचे आव्हान पोलिसांसमोर उभे झाले आहे. खून, दरोडा, लुटमार, अपहरण, बलात्कार, छेडखानीसारख्या गंभीर गुन्हय़ांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुंडांकडून व्यावसायिक, बिल्डर, नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी गुन्हा कोणताही घडो, सर्वप्रथम नागरिकांनी पोलिसात तक्रार देण्याचे अवाहन केले. पोलिसांना माहिती द्यावी. तक्रार दिल्यानंतर पोलिस कारवाई करून गुंडांना अटक करतात. चोरी, घरफोडीचे गुन्हे सातत्याने उघडकीस येत आहेत. नागरिकांनी पोलिसांना दोष देण्याऐवजी त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे गुन्हेगारी वाढत आहे, कायदा व सुव्यवस्था ढासळली हे म्हणणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी नोंदविले.