शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘जलमित्र अभियाना’चा थाटात शुभारंभ

By admin | Updated: May 11, 2016 02:35 IST

अकोला येथील हॉटेलचालकांचा सक्रिय सहभाग; पाणी बचतीचा निर्धार नोंदविला.

अकोला: सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणे आवश्यक असल्याने 'लोकमत'चे वाचक आणि नागरिकांमध्ये जनजागरण करण्यासाठी हाती घेतलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानाचा मंगळवार, १0 मे रोजी अकोल्यात थाटात शुभारंभ झाला. सहा आठवड्यांच्या या मोहिमेत शहरातील हॉटेलचालक सक्रिय सहभागी झाले असून, प्रत्येक हॉटेलमध्ये पाणीबचत करण्यात येईल, असा निर्धार त्यांनी लोकमत शहर कार्यालयात पार पडलेल्या मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी केला. महाराष्ट्रातील बहुतांश भागासह देशात विविध ठिकाणी सध्या जलसंकट ओढवले आहे. या स्थितीत पाण्याची बचत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्‍वभूमीवर ह्यलोकमतह्णने जलसाक्षरतेसाठी जलमित्र अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. या जलमित्र अभियानाचा शुभारंभ मंगळवार, १0 मे रोजी गीता नगरातील ह्यलोकमतह्ण शहर कार्यालयात झाला. यावेळी खाद्यपेय विक्रेता संघाचे अध्यक्ष तथा हॉटेल मिर्च मसालाचे संचालक योगेश अग्रवाल यांच्या पुढाकाराने शहरातील नामवंत हॉटेल व्यवसायिक आवर्जून सहभागी झाले होते. लोकमतच्या वतीने अकोला आवृत्तीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, उप वृत्त संपादक राजू ओढे हे प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांना सहा आठवड्यांच्या या अभियानाची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात आली. या अभियानाचे पोस्टर व इतर साहित्य आपापल्या हॉटेल्समध्ये लावून पाणी बचतीचा संदेश देण्याची तयारी सर्वांनीच दर्शविली, तसेच पाणी बचतीसाठी काही पर्यायही सुचविले. मान्यवरांचे यावेळी लोकमतच्या वतीने स्वागत करण्यात आले. या स्तुत्य अभियानात सर्वांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅन्टीन आणि मेसमध्ये 'ग्लास ऑफ वॉटर ऑन ग्राऊंड' ही मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.