शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांपर्र्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचावे

By admin | Updated: December 5, 2014 01:29 IST

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी परिसंवादात तज्ज्ञांचे मत

अकोला: सततच्या नापिकीमुळे शेतकरी खचला असतानाच विदर्भातील महिला शेतकर्‍यांमधील अंगभूत निर्णयक्षमतेमध्ये विदर्भातील शेतीला तारून नेण्याची क्षमता आहे; मात्र त्या क्षमतेचा पूर्ण उपयोग होणे गरजेचे आहे. आज शेती तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत असताना शेतकर्‍यांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचू शकले नाही. त्यामुळे समाजाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांपर्यंत नवीन विज्ञानाचा दुवा पोहोचला पाहिजे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी संवाद -२0१४ अंतर्गत ह्यअप्रचलित शेती आणि तंत्रज्ञानह्ण या विषयावरील परिसंवादात उमटला. जगातील बहुतांश भागातील शेती आज प्रगत होत असून, अन्नधान्याच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. असे असतानादेखील प्रत्येक तोंडापर्यंत पुरेसे अन्न पोहोचले नसल्याचे वास्तव इंग्लंड येथील कृषितज्ज्ञ जीम विगन यांनी परिसंवादात मांडले. त्यांनी उत्पादनवाढीबरोबरच बाजारात सुरू असलेल्या नफेखोरीवर अंकु श आणण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी नैतिक मूल्यांचा ऊहापोह करून प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:पासून करण्यावर भर दिला. सुसंवाद, सेवा आणि एकात्मतेचा संदेश त्यांनी दिला. अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डेव्हिड विनडॉर्फ यांनी माती परीक्षणाच्या आधुनिक पद्धतीवर प्रकाश टाकला. अद्ययावत पद्धतीनुसार मातीचे प्रत्यक्ष नमुने न घेता केवळ लेझर किरणांद्वारे माती परीक्षणातून मातीची गुणवत्ता, त्यातील जीप्सम, सल्फर व अन्य घटकांचे प्रमाण लक्षात येत असल्याचे नमूद केले. या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग घेण्यासाठी टेक्सास विद्यापीठाशी करार करण्यावर विचार करण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी यावेळी स्पष्ट केले. इस्त्रायल येथील संत्राउत्पादक तज्ज्ञ डोह रॅबेर यांनी संत्र्याची जास्त घनता लागवड पद्धतीवर प्रकाश टाकून शेतकर्‍यांच्या शंकांचे निरसन के ले. सर रतन टाटा ट्रस्टचे अमितांशु चौधरी यांनी ट्रस्टद्वारे चालविण्यात येत असलेल्या कृषी उपक्रमांवर प्रकाश टाकला. कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक पी. जी. इंगोले यांनी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून महिला सबळीकरण प्रकल्पावर प्रक ाश टाकला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी आशिया पॅल्ट्यू या संस्थेचे संचालक डॉ. रवींद्र राव होते. मंचावर प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव देशमुख, डॉ. एस. के. अहेरकर आणि अमेरिकेतील कृषितज्ज्ञ सारा ह्यूमन उपस्थित होते. *शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाचा लाभ होतो का? तंत्रज्ञान शेतीपूरक असले तरी ते व्यापारी तत्त्वाला धरून असते. पण त्याच्या वापरातून शेतकर्‍याला लाभ मिळणार असेल, तरच तंत्रज्ञानाचा प्रसार होऊ शकतो अन्यथा नाही, अशी कोपरखळी प्रगतिशील शेतकरी ललित बहाळे यांनी परिसंवादादरम्यान मारली. तज्ज्ञांशी प्रश्नोत्तराच्या तासांत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला.*शेती केवळ पोट भरण्याचा धंदा झालाशेती पैसा कमाविण्याचा धंदा नाही, तो केवळ पोट भरण्याचा धंदा म्हणून शिल्लक राहिला असल्याची खंत यवतमाळ येथील सेंद्रिय शेती कसणारे शेतकरी कमलकिशोर धोरण यांनी व्यक्त केली. विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेती चळवळ अधिक व्यापक करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.