शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

अखेरच्या क्षणी उलथापालथ !

By admin | Updated: February 4, 2017 02:45 IST

महापौरांना नाकारले तिकीट; काँग्रेसच्या उषा विरक पतीसह राष्ट्रवादीत.

अकोला, दि. 0३- महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये महासंग्राम रंगला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय सारीपाटावर प्रचंड उलथापालथ झाली. भाजपने विद्यमान महापौर उज्ज्वला देशमुख यांना तिकीट नाकारून अनेकांना धक्का दिला, तर दुसरीकडे काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उषा विरक यांनी अंतिम क्षणी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह भारिप-बहुजन महासंघाने सर्वच ८0 जागांवर उमेदवार उभे केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अवधी दिला होता. बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ह्यएबी फॉर्मह्णचे वाटपच केले नाही. साहजिकच, इच्छुकांचे डोळे याद्यांकडे लागले होते. इच्छुकांच्या हातामध्ये एबी फॉर्म न देता त्याने काढलेल्या ऑनलाइन अर्जाच्या प्रिंटला एबी फॉर्म जोडण्याचे काम पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी केले. त्यामुळे ज्या उमेदवारांचा पत्ता कट करायचा होता, त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवण्यात आल्याचे समोर आले. भाजपने तर चक्क विद्यमान महापौर उज्‍जवला देशमुख यांना उमेदवारी नाकारून सर्वांनाच आर्श्‍चयाचा धक्का दिला. प्रभाग क्रमांक १0 मधील विद्यमान नगरसेवक योगेश गोतमारे यांनाही तिकीट नाकारले, तर दुसरीकडे गेल्या निवडणुकीत पक्षासोबत बंडखोरी करून अपक्ष निवडून येणार्‍या संजय बडोणे, माधुरी बडोणे यांना उमेदवारी दिली. अंतर्गत कलहाची लागण इतरही पक्षांना झाली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उषा विरक यांनी प्रभाग क्रमांक १२ मधून स्वत:सह त्यांचे पती जगजितसिंग विरक यांच्यासाठी तिकीट मागितले होते. पक्षाने दोन तिकिटे देण्यास नकार दिल्यानंतर उषा विरक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीकडून दोन तिकिटे पदरात पाडून घेतली. नगरसेवकांना संधी; गटनेत्यांना नाकारलेभाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह भारिप-बहुजन महासंघाने विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी दिली आहे. महापालिकेत पक्षहिताला प्राधान्य देणार्‍या गटनेत्यांपैकी भाजपच्यावतीने प्रभाग १0 मधून वैशाली शेळके, शिवसेनेच्या गटनेत्या मंजूषा शेळके, काँग्रेसचे गटनेता साजीद खान यांना प्रभाग ७ मध्ये उमेदवारी देण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता राजू मुलचंदानी यांना पक्षाने तिकीट नाकारले. भारिप-बमसंचे गटनेता गजानन गवई यांच्याऐवजी त्यांच्या सुविद्य पत्नी यांना प्रभाग १८ मधून उमेदवारी मिळाली आहे.