शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शहीद सुमेध गवई यांना अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 20:40 IST

अकोला : देशाचे रक्षण करत असताना जम्मू- काश्मीरमधील शोपिया येथे दहशतवाद्यांनी केलेल्या  हल्ल्यात शहीद झालेले अकोला तालुक्यातील लोणाग्रा  येथील वीर सुमेध गवई यांच्यावर लोणाग्रा येथे संपूर्ण  शासकीय इतमामात, लष्कर आणि महाराष्ट्र  पोलिसांच्यावतीने मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्या त आले. 

ठळक मुद्देलोणाग्रा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार हजारो नागरिकांची उपस्थितीलष्कर आणि महाराष्ट्र  पोलिसांच्यावतीने मानवंदना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशाचे रक्षण करत असताना जम्मू- काश्मीरमधील शोपिया येथे दहशतवाद्यांनी केलेल्या  हल्ल्यात शहीद झालेले अकोला तालुक्यातील लोणाग्रा  येथील वीर सुमेध गवई यांच्यावर लोणाग्रा येथे संपूर्ण  शासकीय इतमामात, लष्कर आणि महाराष्ट्र  पोलिसांच्यावतीने मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्या त आले.  यावेळी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार  बळीराम सिरस्कार, जि.प. अध्यक्ष संध्या वाघोडे,  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस  अधीक्षक राकेश कलासागर, पुलगाव येथील सेशन  कमांडर आशिषसिंग चंदेल, माजी आमदार नारायणराव  गव्हाणकर, हरिदास भदे, जिल्हा सैनिक कल्याण  अधिकारी सुरेश खंडारे, माजी सैनिक संघटना, माजी  सैनिक महार रेजिमेंट संघटना एनसीसी ऑफीसर डॉ.  आनंद काळे लोणाग्राचे सरपंच निर्मला सोनोने तसेच वीर  जवानाचे वडील वामनराव शंकरराव गवई, आई मायाव ती व भाऊ शुभम गवई यांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण  करण्यात आले.  सोमवारी १२ वाजता लोणाग्रा येथील घरापासून अं त्ययात्रा सुरू झाली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत  थोडावेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. तेथून रमेश  चांडक यांच्या शेतात गावातून मिरवणूक काढून नेण्यात  आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने उ पस्थित असलेल्या पंचक्रोशीतील नागरिकांनी सुमेध  गवई अमर रहे, भारत माता की जय, जय हिंदच्या  घोषणा दिल्या. रमेश चांडक यांच्या शेतातील अं त्यविधीसाठी तयार करण्यात आलेल्या जागेवर नेल्यानं तर प्रथम आई-वडिलांनी पुष्पचक्र अर्पण केले, त्यानंतर  पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक संघटना,  जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी, पोलीस  प्रशासनाच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावतीने  पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडून  आकाशात फायरिंग करून सलामी देण्यात आली, नंतर  लष्कराच्यावतीने सलामी देण्यात आली. यावेळी बौद्ध  धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे सामूहिक त्रीशरण, पंचशील  प्रार्थना यावेळी कण्यात आली. सलामी आणि  मानवंदनेनंतर पार्थिवाला शहीद सुमेध गवई यांचे वडील  वामनराव गवई यांनी मुखाग्नी दिला. यावेळी हजारो  लोकांनी साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण केली.