शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शहीद सुमेध गवर्ईंना अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:04 IST

अकोला - श्रीनगरमधील अनंतनागनजीक असलेल्या शोपिया जिल्हय़ात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सुमेध वामनराव गवई यांच्यावर लोणाग्रा येथे सोमवारी दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत मातेच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्हय़ातील गावागावांतून मोठा जनसमुदाय उसळला होता. हजारोंच्या साश्रुनयनांनी ‘सुमेध गवई अमर रहे’च्या जयघोषात अखेरचा निरोप देण्यात आला.

ठळक मुद्देशासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अलोट जनसमुदाय गहीवरला!लोणाग्रा येथे सोमवारी दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कारअखेरचा निरोप देण्यासाठी जिल्हय़ातील गावागावांतून उसळला मोठा जनसमुदाय

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला - श्रीनगरमधील अनंतनागनजीक असलेल्या शोपिया जिल्हय़ात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या सुमेध वामनराव गवई यांच्यावर लोणाग्रा येथे सोमवारी दुपारी २ वाजता शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत मातेच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्हय़ातील गावागावांतून मोठा जनसमुदाय उसळला होता. हजारोंच्या साश्रुनयनांनी ‘सुमेध गवई अमर रहे’च्या जयघोषात अखेरचा निरोप देण्यात आला.शोपिया जिल्हय़ात शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तीन गोळय़ा लागल्याने अकोला जिल्हय़ातील लोणाग्रा येथील रहिवासी वीरपुत्र सुमेध वामनराव गवई (२६) यांना वीरमरण आले होते. त्यानंतर दिल्ली येथील लष्कराच्या छावणीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव विमानाने नागपूर येथे व नंतर सोमवारी सकाळी लोणाग्रा येथे लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिक आणण्यात आले. तत्पूर्वी अशोक वाटिका येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजता सुमेध गवई यांचे पार्थिव राहत्या घरी आणण्यात आले. तसेच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक व प्रशासनातील अधिकार्‍यांनी पुष्पचक्र अर्पण करून  शहीद जवान सुमेध गवई यांना श्रद्धांजली वाहिली. दुपारी २ वाजताच्या सुमारास शोकाकुल वातावरणात रमेश चांडक यांच्या शेतात शासकीय इतमामात शहीद जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान सुमेध गवई यांना त्यांचे वडील वामनराव शंकरराव गवई, आई मायावती, बहीण प्रीती, भाऊ शुभम 

सैन्य दलातर्फे मानवंदनासैन्य दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून वीरपुत्र सुमेध गवई यांना मानवंदना देण्यात आली. यासोबतच पोलीस दलानेही मानवंदना दिली. त्यानंतर सामुदायिक त्रीशरण-पंचशील ग्रहण केल्यानंतर लष्क रात असलेले त्यांचे बंधू शुभम वामनराव गवई यांनी शहीद जवान सुमेध गवई यांना मुखाग्नी दिला.